लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: बदलापूर जवळील बारवी धरणातून येणारी जलवाहिनी शनिवारी पहाटे साडे चार वाजता काटई-बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील हेदुटणे गावाजवळ फुटली. व्हॉल्व सैल होऊन त्यावर पाण्याचा दाब वाढल्याने हा प्रकार घडला. जलवाहिनीतील पाण्याच्या अतिदाबामुळे पाण्याचे कारंजे ४० ते ५० फूट उंच उडत होते. यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले.
पाण्याचे कारंजे मोबाईलमध्ये टिपण्यासाठी वाहन चालक, प्रवासी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवत होते. परिसरातील नागरिकांची कारंजे बघण्यासाठी झुंबड उडाली होती.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Mumbai national park encroachment loksatta news
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…

बारवी धरणातून ठाणे, कळवा, मुंब्रा, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, डोंबिवली परिसराला दररोज सुमारे ९०० ते अकराशे दशलक्ष लीटर पाणी पुरवठा दररोज केला जातो. सोळाशे मिलमिटर व्यासाच्या जलावाहिन्यांमधून हा पुरवठा केला जातो. या वाहिन्यांच्या सुमारे ५० ते १०० मीटर अंतरावर पाण्याने भरलेल्या जलवाहिन्यांमधील दाब नियंत्रित करण्यासाठी व्हॉल्व आहेत.

आणखी वाचा- ठाणे : जिल्ह्यातील तापमान पुन्हा चाळीशीपार; जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमानात पुन्हा वाढ

शनिवारी सकाळी हेदुटणे गावाजवळील समाधान हॉटेल समोरील जलवाहिनीवरील दाब नियंत्रित करणारा व्हॉल्व सैल झाला. पाण्याच्या अतिदाबामुळे तो सैल होण्याचे प्रमाण वाढत गेले. व्हॉल्ववर जलवाहिनीतील पाण्याचा दाब वाढून पाणी अति वेगाने बाहेर फेकले गेले, असे एमआयडीसी अधिकाऱ्याने सांगितले. जलवाहिनीवरील व्हॉल्वमधून पाणी गळती सुरू झाल्याची माहिती मिळताच पहाटेच एमआयडीसी डोंबिवली विभागाचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड, उपअभियंता विजय शेलार दुरुस्ती पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

बारवी धरणाकडून जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे उपअभियंता शेलार यांनी सांगितले.

आणखी वाचा- ठाणे : मेट्रो मार्गाच्या कामासाठी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी

शहरांना फटका

ठाणे, मुंब्रा, कळवा, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, डोंबिवली निवासी, औद्योगिक क्षेत्रामधील पाणी पुरवठ्यावर जलवाहिनी फुटल्याचा परिणाम होणार आहे. या शहरांना शनिवारी सकाळी, संध्याकाळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीमधून पुन्हा पाणी सोडल्यानंतर त्या पूर्ण भरण्यास चार ते पाच तास लागतात. त्यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत जलवाहिनी मधील ही पातळी पूर्ण होईल. रविवारी सकाळपासून दिवसभरात नागरिकांना नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा होईल, असे अधिकारी म्हणाला.

Story img Loader