पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या डांबरीकरणासाठी मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी सकाळी ६ आणि बुधवारी रात्री ११ ते गुरुवारी सकाळी सहावाजेपर्यंत कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात येणार आहे. डांबरिकरणानंतर लवकरच हा मार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, मुख्य पुलाच्या म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यानुसार, उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाच्या वतीने मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी सकाळी ६ आणि बुधवारी रात्री ११ ते गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा – ठाण्यात ४५१ किलो प्लास्टिकचा साठा जप्त

असे आहेत वाहतूक बदल जड-अवजड वाहनांकरीता

१) नाशिक मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईच्या दिशेने वाहतूक कणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे ‘प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने खारेगांव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा मार्गे महापे मार्गे रबाळे ऐरोली पूल येथून इच्छित स्थळी जातील.

२) घोडबंदर मार्गाने मुंबई जाणारी वाहने माजीवडा पुलाखाली वेश बंद असेल. येथील वाहने तत्त्वज्ञान सिग्नल पुढे माजीवाडा पूलावरून खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापे मार्गे जातील.

हेही वाचा – ठाणे : लाचेप्रकरणी न्यायालयाचा कनिष्ठ लिपीक अटकेत

हलक्या वाहनांकरीता

१) नाशिक, घोडबंदर मार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना तीन हात नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने साकेत, कळवा मार्गे ऐरोली पूल येथून मुंबईच्या दिशेने वाहतूक करतील. किंवा मध्यवर्ती कारागृह येथून कळवा, एरोली पूल मार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक करतील. तसेच तीन हात नाका येथून एलबीएस रोड मार्गे किंवा तीन हात नाका येथून सेवा रस्ता, बाराबंगला, आनंदनगर मार्गे वाहतूक करतील.

Story img Loader