डोंबिवली – यापूर्वीच्या २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून कल्याण लोकसभेसाठी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना निवडून आणले. आता त्यांच्या बाजूने व्हाॅट्सअ‍ॅप , फेसबुकवर लिखाण करणारे समाज माध्यमी सल्लागार कार्यकर्ते त्यावेळी कोठे होते? असा प्रश्न करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार डाॅ. शिंदे यांच्या समाज माध्यमी सल्लागार कार्यकर्त्यांना लक्ष्य केले.

डोंबिवलीत फक्त शिवसेनेकडून विकास कामे केली जात आहेत. स्थानिक नेतृत्व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण डोंबिवलीचा चेहरामोहरा बदलू शकले नाहीत. मागील पंधरा वर्षांत त्यांनी शहर म्हणून काहीही काम केले नाही, हे जनतेच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीकडून सातत्याने केला जात आहे. कोट्यवधीचा निधी आणणारे आपणच कसे कार्यसम्राट हे दाखविण्याचा या नेत्याचा प्रयत्न भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खुपत आहे. तुम्ही जरूर विकास कामे करा, पण भाजपा, मंत्री चव्हाण, त्यांच्या समर्थकांना का लक्ष्य करता, असे भाजपाच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

हेही वाचा – डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखावर हल्ला

मंत्री चव्हाण यांना लक्ष्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निकटवर्तियाने मानपाडा पोलीस ठाण्याचे बहुचर्चित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या साहाय्याने मंत्री चव्हाण समर्थक नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. शिवसेनेच्या या नेत्याला धडा शिकवण्यासाठी भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता जिवाचे रान करण्याचे ठरविले आहे. तशा आणाभाका घेण्यात आल्या आहेत.

ठाण्यातील भाजपाच्या रविवारच्या मेळाव्यात कल्याण, ठाणे लोकसभा भाजपाच लढविणार असा पवित्रा भाजपाने घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅ. शिंदे यांची मोठी कोंडी करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री खासदार सुपुत्राला कोणत्याही परिस्थितीत कल्याण काय ठाणे लोकसभेतून उमेदवारी मिळणार नाही यादृष्टीने भाजपाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्षांतील वरिष्ठ नेते ठाणे, कल्याण लोकसभेत भाजपाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेविषयी समाधान व्यक्त करत आहेत, असे भाजपामधील एका विश्वसनीय नेत्याने सांगितले.

हेही वाचा – “जेव्हा बोट बुडेल तेव्हा पळणारा पहिला उंदीर…”, राजन विचारेंची खोचक टीका, नेमका रोख कुणाकडे?

कल्याण लोकसभा मतदारसंघात सतत भाजपा कार्यकर्त्यांना विविध कारणांमुळे बदनाम करणारे शिवसेनेतील खासदार शिंदे यांचे आताचे सल्लागार त्यावेळी कोठे होते. शिंदे यांच्या विजयात त्यांचे योगदान काय होते, असे खोचक प्रश्न करत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिंदे समर्थक डोंबिवलीतील एका पदाधिकाऱ्याला लक्ष्य केले. भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या पाठीशी राहणे हे आमचे कर्तव्य आहे. तेच मी करतोय असे सांगत मंत्री चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांनी हे प्रकरण किती ताणायेच हे ठरवावे, असा सल्ला मंत्री चव्हाण यांनी खासदारांसह त्यांच्या माध्यमी सल्लागारांना दिला आहे.

तुम्ही तुमच्या चौकटीत रहा, नाहीतर तुम्हाला धडा शिकविण्यासाठी आमचे एक दादा पुरसे आहेत, अशा प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांमध्ये व्यक्त केल्या आहेत.

Story img Loader