बाजार, राजकारणातील आपला ‘टीआरपी’ कसा वाढेल यासाठी प्रत्येकजण उठसुट उलटसुलट वक्तव्य करतो. अशा वक्तव्य करणाऱ्यांचा बंदोबस्त शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन झाला आहे. त्यामुळे टीआरपीचा हा खेळ आता कायमचा बंद होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी येथे दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्री चव्हाण यांच्या बोलण्याचा रोख मागील काही दिवसांपासून शिवसेनेकडून भाजपला लक्ष्य करणाऱ्या खासगी जनसंपर्क एजन्सी आणि शिवसेनेतील त्यांचे पाठराखे यांच्याकडे होता.

हेही वाचा >>> कल्याण: उध्दव ठाकरेच पहिले आणि खरे गद्दार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील सामान्यांसाठीच्या योजनांची माहिती देण्यासाठी मंत्री चव्हाण, कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक साई शेलार यांनी पाथर्ली इंदिरानगर झोपडपट्टीत जनसंपर्क अभियानांतर्गत एक फेरी काढली. यावेळी मोदींच्या मागील नऊ वर्षातील विकास कामे, सामान्यांसाठी केलेल्या कामांची मंत्री चव्हाण यांनी रहिवासांना दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासासाठी झटपट निर्णय घेत आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुका युतीमधून लढविल्या जाणार आहेत. यासाठी वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षाचे नेते व्यूहरचना आखत आहेत. स्थानिक पातळीवर टीआरपी वाढविण्यासाठी कोण काय बोलतोय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हा टीआरपीचा विषय आता कायमचा बंद झाला आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाण्यात शिक्षणाचा खेळखंडोबा? शहरात अनधिकृत शाळा सुरूच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निकटवर्तियाला बोलावून ‘तुमच्या पीआर एजन्सीना आवर घाला, अन्यथा सरकार घालवाल, अशी तंबी दिल्यापासून समाज माध्यमातील शिवसेनेची भाजपला लक्ष्य करण्याची मोहीम थंडावली आहे.

डोंबिवलीतील शिवसेनेचा एक पदाधिकारी कल्याण ग्रामीण मधून विधानसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार असेल असे वक्तव्य करत होता. मंत्री चव्हाण यांनी अशा विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही. उमेदवारीचे युतीचे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जाणार आहेत. स्थानिक पातळीवर अशी विधाने करुन प्रत्येक जण आपला टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister ravindra chavan inform about the development scheme of modi government in the last nine years zws
Show comments