बदलापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई उपनगरांना जोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गातील माळशेज घाटातील प्रवास लवकरच सुखकर होणार आहे. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने माळशेज घाटात नव्या बोगद्याची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मंत्रालयाला याबाबत पत्र दिले होते. 

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना अहमदनगर आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा आहे.

Vasu Baras 2024
Vasu Baras 2024:धेनुगळ म्हणजे काय?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
odisha cyclone
ओडिशात १.७५ लाख एकर पिकांचे नुकसान, दाना चक्रीवादळाचा परिणाम
Work of second tunnel in Matheran hill of Baroda Mumbai highway completed
बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण
dr madhukar bachulkar new mahabaleshwar
नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी, डॉ. मधुकर बाचूळकर यांचे टीकास्त्र
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
traffic on Solapur road, Fatimanagar Chowk, Signal off at Fatimanagar Chowk, pune,
पुणे : सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार? फातिमानगर चौकातील सिग्नल बंद
crops damage in Maharashtra
राज्याच्या अनेक भागांना पावसाचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती

या मार्गावरील ठाणे आणि पुणे जिल्ह्यांमधला माळशेज घाट हा महत्त्वाचा रस्ता आहे. यातील घाटाचा भाग सुमारे १० किलोमीटर लांब असून हा भाग मुरबाड तालुक्यातील सावर्णे येथून सुरू होतो. तर जुन्नर तालुक्यातील खुबी येथे संपतो. यातील बोगद्यापूर्वीचा सुमारे अडीच किलोमीटरचा भाग हा सर्वात धोकादायक आहे. ज्यात डाव्या बाजूला अडीचशे मीटर खोल दरी आणि महामार्गाच्या उजव्या बाजूला उंच डोंगररांगा आहेत. या  डोंगररांगातील भुसभुशीत जमिनीमुळे पावसाळय़ात भूस्खलन होऊन दरड कोसळण्याची शक्यता असते.

पावसाळय़ात डोंगररांगांतून उगम पावणारे अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. गेल्या काही वर्षांत अनेकदा भूस्खलन किंवा खडक कोसळल्याने धबधब्यांखालील पर्यटकांचे मृत्यू झाले आहेत. परिणामी वाहतूकही बंद होते. त्यामुळे या भागात नव्या बोगद्याची निर्मिती करण्याची मागणी मुरबाड  विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी केली होती. रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यांनी या मागणीची दखल घेत संबंधित प्रकरण तांत्रिक सल्लागारांकडे सुपुर्द केले होते.

आता मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार बी. डी. ठेंग यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी व मुख्य अभियंत्यांना याबाबत तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिल्याची माहिती किसन कथोरे यांनी दिली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच कार्यालयाला प्राप्त झाले असून व्यवहार्यता तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या बोगद्यामुळे येथील वाहतूक सहज व सुरक्षित होणार आहे असा विश्वास कथोरे यांनी व्यक्त केला आहे.