कल्याण : मुरबाड तालुक्यातील एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पीडित मुलगी राहत असलेल्या गावातील एका रहिवाशाने लैंगिक अत्याचार केला आहे. हा रहिवासी यापूर्वी गावचा उपसरपंच होता. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल करून संबंधित रहिवाशाला सोमवारी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मुरबाड तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी राहते. तिच्या घराच्या शेजारी माजी उपसरपंचाचे घर आहे. पीडित मुलगीत दहावीत इयत्तेत शिक्षण घेते. पीडितेला दहावीच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने माजी उपसरपंच पीडितेला घराजवळील एका पडक्या घरात बोलावून तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकाराविषयी बाहेर कोणाला न सांगण्याची धमकी माजी उपसरपंचाने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी घडत असलेला प्रकार सहन करत होती.

हे ही वाचा…कडोंमपा शाळेत नियमित वेळेत न येणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करा,आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

पीडित मुलीचे आई, वडिल पुण्याजवळ एका कंपनीत सेवक म्हणून काम करतात. माजी उपसरपंचाकडून लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत चालल्याने पीडित मुलगी अस्वस्थ होती. याविषयी उघड बोलले तर आपणास त्रास होईल या भीतीने ती कोणाला काही सांगत नव्हती. या अस्वस्थतेमधून पीडित मुलीने राहत्या घरात किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने हा प्रकार का केला याविषयी कोणाला काहीच समजले नाही. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पीडितेला तातडीने मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुणे येथे असलेल्या मुलीच्या आईला निरोप देण्यात आला. मुलीची आई रुग्णालयात आली. त्यावेळी पीडितेने तिच्याबाबतीत माजी उपसरपंचाकडून होत असलेल्या त्रासाबाबत तक्रार केली. हा प्रकार ऐकून मुलीची आईला धक्का बसला. तिने तातडीने मुरबाड पोलीस ठाणे गाठले. तेथे लैंगिक अत्याचार करणाऱ्या माजी उपसरपंचाविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल करून माजी उपसरपंचाला अटक केली. मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कामत यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेने मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl in murbad taluka sexually assaulted by resident of village sud 02