ठाणे : बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच, दिवा शहरातील शाळेमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत. पिडीत मुलीने शाळेच्या प्राध्यापिकेला गैरप्रकाराची माहिती दिली होती. परंतु तिने मुलीला याबाबत घरी सांगू नको, असे बजावले होते. त्यामुळे पोलिसांनी प्राध्यापिकेला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवा भागातील एका खासगी शाळेमध्ये पिडीत मुलगी शिकत आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता तिला वडिलांनी शाळेत सोडले. दुपारी पिडीत मुलीला शाळेतील कर्मचारी घरी सोडण्यास आले. पिडीत मुलगी घरी आली त्यावेळी तिची आई कामानिमित्ताने बाहेर होती. तिच्या आईला शाळेतील एका पालकाने घडलेला प्रकाराबाबत विचारणा केली. पिडीत मुलीच्या आईने घरी संपर्क साधून मुलीला विचारणा केली असता, वर्गात कोणीही नसताना एका व्यक्तीने तिच्यासोबत गैरप्रकार केल्याची माहिती तिने आईला दिली. पिडीत मुलीसोबत हा प्रकार झाल्यानंतर तिने आरडाओरड केला.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात भाजपचा जल्लोष, शिंदेच्या सेनेत मात्र शुकशुकाट

त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून जात होता. मुलीचा आरडाओरड ऐकून शाळेतील शिक्षिका तिथे आल्या होत्या. त्यांनी त्या व्यक्तीला विचारणा केली. परंतु त्याने मुलीला शाळेत सोडायला आल्याचे सांगत पळ काढला. पिडीत मुलीला शाळेच्या कार्यालयात आणल्यानंतर तिने प्राध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. परंतु त्यांनी या प्रकाराबाबत घरी कोणालाही सांगू नको असे बजावले. पिडीत मुलीसोबत घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पिडीत मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती पिडीत मुलीने प्राध्यापकांना दिली असतानाही त्यांनी मुलीला कोणासही सांगू नको असे धमकाविल्याने पोलिसांनी प्राध्यापिकेला अटक केली आहे. तर मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

या प्रकरणात प्राध्यापिकेला अटक केली आहे. तर मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे. – अनिल शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे.