कल्याण- कल्याण मध्ये कचरा वेचक कुटुंबातील एका १० वर्षाच्या मुलीचा सापर्डे गावातील एका ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सोमवारी रात्री विनयभंग केला. अल्पवयीन मुलगी रात्री नऊच्या सुमारास घराजवळील दुकानात जात असताना हा प्रकार घडला आहे, अशी माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत आयरे गावमध्ये तलाव बुजवून बेकायदा चाळींची उभारणी, भूमाफियांकडून १५० चाळींचे नियोजन

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?

विनयभंग करणाऱ्या इसमाविरुध्द मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन बाल लैंगिक अत्याचार कायद्याने (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, कल्याण परिसरातील ग्रामीण भागात एक कचरा वेचक कुटुंब आपल्या मुलांसह राहते. दिवसभर पालिकेच्या कचराभूमीवर कचरा वेचण्याचे काम करुन त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करते. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीला घर परिसरातील दुकानातून तंबाखुची पुडी आणण्यास सांगितली. मुलीने दुकानात जाऊन पुडी विकत घेतली. ती पुन्हा आपल्या घराकडे पायी येत होती. त्यावेळी तिला वाटेत एक ज्येष्ठ इसम भेटला. त्याने मुलीशी बोलण्याचा बहाणा करुन तिला काही कळण्याच्या आत जवळ खेचले. तिचा विनयभंग केला. मुलीने त्या इसमाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने दाद दिली नाही. मुलीने त्या इसमाला जोराचा झटका देऊन त्याच्या तावडीतून ती निसटली. घडल्या प्रकाराने मुलगी घाबरली होती. ती घरी रडत आली. तिने आपल्याशी वाटेत आपल्या भागात राहत असलेल्या एका इसमाने गैरवर्तन केले आहे, असे आई, वडिलांनी सांगितले.

हेही वाचा >>> “मर्द-मर्द म्हणणाऱ्यांनी मर्दासारखं वागावं”, ठाण्यात बॅनरद्वारे शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला

पीडीत मुलगी, तिचे पालक आणि चाळीतील इतर रहिवासी मुलीने वर्णन केलेल्या प्रकाश सोंग्या पाटील (६१, रा. शिवनगर, सापार्डे, कल्याण) याच्या घरी गेले. तो घरी नव्हता. त्याच्या पत्नी, मुलाकडून पीडित मुलीच्या वडिलांनी त्याचा मोबाईल क्रमांक घेतला. त्याला संपर्क करुन तू माझ्या मुलीशी काय वर्तन केले, असा प्रश्न प्रकाशला केला. तेव्हा तो निरुत्तर झाला. त्याने नंतर संपर्काला प्रतिसाद दिला नाही. प्रकाशने आपल्या मुलीशी गैरवर्तन केल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी प्रकाश पाटील विरुध्द विनयभंगाची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रकाशचा तपास सुरू केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गवळी याप्रकरणाचा तपास करत आहेत.