ठाणे : भिवंडी येथे अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी २४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. तपासा दरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने या मुलीचे तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा बनाव केला होता.

भिवंडी येथील सोनाळे गाव भागात पीडित १० वर्षीय मुलगी तिची आई आणि सावत्र वडिलांसोबत राहाते. रविवारी तिच्या कुटुंबियांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित मुलीचे परिसरातून तीन जणांनी अपहरण केले होते. तसेच तिला एका डोंगरावर नेऊन एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला घराजवळ आणून सोडून दिले असे तक्रारीत म्हटले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडी तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला.

Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
Badlapur Case, High Court, police duty,
बदलापूर प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचा सवाल
Pune Porsche accident, minor driver friend,
पुणे पोर्शे अपघात : अल्पवयीन चालकाच्या मित्राच्या वडिलांनाही अटकपूर्व जामीन नाही
40 students beaten up in municipal school in Sangli news
सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा

हेही वाचा – ठाणे शहरातील खुल्या व्यायामशाळांची दुरावस्था

हेही वाचा – डोंबिवलीतील गणेश मंदिरात अयोध्येत पूजलेले अक्षत कलश, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांची कसून चौकशी केली असता, पीडित मुलीच्या सावत्र वडिलांनी मुलीची आई घरी नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात समोर आले. तसेच पीडित मुलीलादेखील पोलिसांसमोर खोटी माहिती देण्यास सांगितल्याचे समोर आले. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ जानेवारी २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.