भिवंडी येथील गायत्रीनगर परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून एका युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गायत्रीनगर भागात आमीन राहत असून त्याने दोन महिन्यांपुर्वी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजले. यानंतर याच भागातील एका घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्याकडे असलेले पैसेही चोरले.
या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून दोन महिन्यांनंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी आमीनला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा