नराधम डॉक्टरने त्याच्या क्लिनिकमध्ये कंपाउंडर म्हणून काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. केवळ डॉक्टरच नाही तर क्लिनिकच्या बाजूला असलेल्या औषध दुकानदारानेही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून औषध दुकानदाराचा शोध सुरू आहे.

ताज अन्सारी असं अटक केलेल्या डॉक्टरचं नाव असून दिलदार शेख या औषध दुकानदाराचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील नांदीवली परिसरात आरोपी डॉक्टरचं क्लिनिक आहे. पीडित मुलीची घरटी आऱ्थिक परिस्थिती हलाकीची आहे. तिने केलेल्या तक्रारीनुसार मार्च महिन्यापासून हा प्रकार सुरू झाला. सातत्याने तो लैंगिक अत्याचार करायचा. हा प्रकार कुणाला सांगितला, तर बदनामी करण्याची आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली. डॉक्टरला विरोध केल्यास तो कामावरून काढून टाकेल, या भीतीने पीडित मुलगी निमूटपणे अत्याचार सहन करत होती. तोपर्यंत या प्रकाराची कुणकुण क्लिनिकच्या बाजूलाच असलेला औषध विक्रेता दिलदार शेख याला लागली होती, त्याने एक दिवस डॉक्टर आणि पीडित मुलीचा व्हिडीओ चित्रित केला.

दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी दिलदार शेखने हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करत तिचा विनयभंग केला. यामुळे घाबरलेल्या पीडितेने काम सोडले पण तरीही आरोपींकडून तिला फोनद्वारे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. अखेर मुलीने हा प्रकार हा प्रकार आईला सांगितला. मंगळवारी आईसोबत कोळसेवाडी पोलीस स्थानकात जाऊन तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन तातडीने डॉक्टर अन्सारीला अटक केली. पोलीस दिलदार शेखळा अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते मात्र तोपर्यंत तो घरातून फरार झाला होता. पोलीस सध्या त्याचा शोध घेत असून अटक केलेला डॉक्टर बोगस तर नाही ना याबाबतही तपास केला जात आहे.

Story img Loader