लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील एमआयडीसीतील फेज दोन मधील सुदेवी केमिकल कंपनीत रविवारी रात्री एका १७ वर्षाच्या अल्पवयीन कामगाराला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी या मृत कामगाराच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी या कंपनीचे मालक, चालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra News Live Update in Marathi| Mumbai Pune Live Updates in Marathi
Rahul Gandhi on Haryana Election Result: हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाला…”
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
In Ambernath the husband killed his wife by slitting her throat
पतीनेच चिरला पत्नीचा गळा; अंबरनाथमधील खळबळजनक घटना
bangladesh porn star arrested in ulhasnagar
Porn Star Riya Barde Arrested: बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक; रिया बर्डे नावानं सहकुटुंब करत होती वास्तव्य!
Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार; अक्षय चकमकीत ठार
Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती
Bandra Worli Sea-Link tiepl
Mumbai Accident : वांद्रे-वरळी सी-लिंकवर शर्यतीच्या नादात भीषण अपघात; BMW व Mercedes च्या धडकेत टॅक्सी उलटली

सूर्यदेवकुमार छठु साह (१७) असे मृत अल्पवयीन कामगाराचे नाव आहे. जितेंद्र अग्रवाल हे सुदेवी केमिकल कंपनी चालकाचे नाव आहे. मयत सूर्यदेवकुमार याचा भाऊ बिकीकुमार साह (२१) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साह कुटुंब कल्याण पूर्वेतील पिसवली भागातील शांतीनगर झोपडपट्टीत राहते.

आणखी वाचा-आनंद नगर, मुलुंड कचराभूमीवर कलाकेंद्र आणि रुग्णालय बनवा, मुलुंड ठाण्याच्या वेशीवरील रहिवाशांचे स्वाक्षरी अभियान

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार बिकीकुमार याचा भाऊ मयत सूर्यदेवकुमार साह हा डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोन मधील सुदेवी केमिकल कंपनीत कामाला होता. रविवारी रात्रीच्या वेळेत कंपनीत काम करत असताना सूर्यदेवकुमार याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती साह कुटुंबीयांना कळताच ते कंपनीत दाखल झाले.

कंपनी मालक, चालक यांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांनी कंपनी मालक, चालकांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. अल्पवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, तरी सुदेवी कंपनी व्यवस्थापनाने त्याला कामावर कसे घेतले असे प्रश्न पोलिसांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलास कामावर ठेऊन कंपनीने निष्काळजीपणाचे कृत्य करून, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याने सूर्यदेवकुमार याचा मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आणखी वाचा-पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी

सुदेवी कंपनीत अल्पवयीन कामगार काम करत आहे हे कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या औद्योगिक निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग अधिकाऱ्यांच्या का निदर्शनास आले नाही. त्यांनी या कंपनी मालकावर वेळीच का कारवाई केली नाही, असे प्रश्न या मुलाच्या मृत्युच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.