महापौरांनी पाठ फिरवल्याने लाखो रुपयांच्या साहित्याला भंगारावस्था
मयूर ठाकूर, लोकसत्ता
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या आलिशान महापौर निवासात यापूर्वीच्या महापौरांनी पाठ फिरवल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. बंगल्याची लाखो रुपये खर्चून तयार केलेली सजावट भंगार झाली असून कबुतरांनी बंगल्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे विद्यमान महापौरांची इच्छा असूनही त्यांना या घाणीमुळे बंगल्यात राहता येणार नाही
महानगरपालिकेची २००२ रोजी स्थापना झाली. या स्थापनेवेळीच महानगरपालिकेकडून महापौर निवास तसेच आयुक्त निवासाची निर्मिती करण्यात आली. कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आल्यानंतर केवळ पालिकेचा पदभार स्वीकारणाऱ्या आयुक्तांनीच आपल्या निवासाचा वापर केला; परंतु महापौर निवास सदैव ओस पडलेच आढळून आले. गेल्या १८ वर्षांत आतापर्यंत केवळ २००५ साली मध्यमवर्गीय कुटुंबातील तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या निर्मला साळवी यांनी दोन वर्षांकरिता आपले वास्तव त्या बंगल्यात केले होते. निर्मला साळवी वास्तव्य करण्यास आल्याकारणामुळे पालिकेकडून टेबल, सोफा तसेच घरगुती अशा आवश्यक साहित्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले; परंतु त्यांचा कार्यकाळ समाप्त होताच त्याच्यानंतर एकाही महापौरांनी महापौर निवासाचा वापर न केल्यामुळे त्या सर्व वस्तू अतिशय खराब झाल्याचे आढळून आले आहे.
यंदा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड २६ फेब्रुवारी रोजी पार पडली. या वेळी पुन्हा महापौर पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. भाजप पक्षातून ज्योत्स्ना हसनाळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी वास्तव्य करण्याकरिता महापौर निवासाला भेट दिली; परंतु महापौर निवासाची दयनीय अवस्था झाल्यामुळे त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने आपल्याच राहत्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महापौर निवासाच्या देखरेखीकरिता पालिकेकडून सुरक्षा कर्मचारी आणि नोकर मनी पुरवण्यात येतात; परंतु पुन्हा महापौर निवासाच्या देखरेखीकरिता लाखो रुपये खर्च करावे लागण्यात असल्यामुळे प्रशासनाला गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय खर्च करूनदेखील महापौरांनी त्या बंगल्याचा वापर न केल्यास पुन्हा लाखो रुपयांचे नुकसान उचलावे लागण्याची भीती प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
श्रीमंत महापौरांमुळे अशी स्थिती
आतापर्यंत मीरा भाईंदर महानगरपालिकेत महापौर पद स्वीकारणारे अधिकतर महापौर कोटय़धीशच होते. त्यात गीता जैन, नरेंद्र मेहता, डिंपल मेहता, मेंडोसा तसेच तुळशीदास म्हात्रे यांचे खासगी आलिशान बंगले असल्यामुळे यांनी कधीच महापौर निवासाचा वापर केला नाही. गेल्या अठरा वर्षांत मध्यमवर्गीय कुटुंबातून निर्मला साळवी यांच्याशिवाय एकही महापौर निवडून न आल्यामुळे पालिकेच्या महापौर निवासाची अशी अवस्था झाली असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत.
तीन महिन्यांपूर्वीच महापौर निवासावर पालिकेकडून खर्च करण्यात आला आहे. शिवाय महापौरांना आम्ही बंगला दाखवला असून ते राहण्यास येत असल्यास दुरुस्तीदेखील करण्यात येईल असे सांगितले आहे; परंतु अद्यापही त्यांच्याकडून काही उत्तर आलेले नाही.
– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
महापौर निवासाची सध्या स्थिती अतिशय वाईट आहे. त्या बंगल्यात कबुतरांनी अतिशय दरुगधी केली असल्यामुळे माझ्या आरोग्यास तसेच मला भेटण्यास येणाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मी तेथे न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
– ज्योत्स्ना हसनाळे, महापौर