ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आज आमदार आदित्य ठाकरे येणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे हे वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करून हल्ला चढवीत आहेत. त्यामुळे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेत शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाण्यातील अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. असे असले तरी ठाण्याचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे काही ठिकाणी वर्चस्व आहे. शनिवारी ठाण्यात गटाकडून घोडबंदर भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे हे नवी मुंबईत जाणार आहे. तिथेही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे.