लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे : जितो संस्थेला कॅन्सर युनिट देता, कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचा ताबा आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली देता. त्यातीलच काही कोटी रूपये जर छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाला दिले तर अनेक गरिबांचे जीव वाचतील आणि आपल्या पदरात पुण्य पडेल. शहरातील रंगरंगोटी आणि रोषणाईवर खर्च करून शहर स्मार्ट होणार नाही. त्यासाठी शहराची आरोग्य व्यवस्थाही सक्षम करावी लागते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. ३० टक्के दलालीच्या हव्यासापोटी अनेक तपासण्या करण्यासाठी रूग्णांना बाहेर पाठविले जाते, असा आरोपही त्यांनी केला.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यवस्थापनावर टिका केली. गेली तीस वर्षे जे ठाणे महापालिकेच्या सभागृहामध्ये सत्तेत बसले आहेत, त्यांनी काय केले? असा प्रश्न आहे. गुरूवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात गेलो. तेव्हा, रूग्णालयात भटके श्वान फिरताना दिसत होते. या श्वानांची विष्ठा अनेक ठिकाणी पडली होती. रूग्णांना बाहेर बसण्यासाठी जे कठडे तयार केले आहेत. त्यावरही रूग्ण झोपले होते. एका रुग्णाने आपल्याकडे १२ तास कोणीही लक्ष दिलेले नाही, असे सांगितले. डाॅक्टरांशी रुग्णाने संवाद साधल्यावर आता वेळ नाही, उद्या या असे सांगितले जाते.

आणखी वाचा-कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यानचे रेल्वे फाटक बंद, नवीन उड्डाण पूलावरुन वाहतूक सुरू

छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालयात पंख्याखालील खाट देण्यासाठी ५०० रूपये मागितले जात आहेत. या रूग्णालयात उपचारासाठी गोरगरीब, मागासवर्गीय रूग्ण जात असतात. त्यांचा अप्रत्यक्ष छळच केला जात आहे. ठाणे शहर स्मार्ट केले जात आहे. शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी,रोषणाई केली जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. त्यापेक्षा येथील गरीब रूग्णांच्या जीवाशी खेळ होऊ नये, म्हणून त्या पैशांचा वापर आरोग्य सुविधांसाठी केला गेला तर ठाणेकर आयुष्यभर आपले उपकार मानतील, असा सल्लाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

जेवणासाठीही रूग्णांना घरातून वाडगे आणायला सांगितले जाते. ३० टक्के दलाली मिळवण्यासाठी रक्त, विष्ठेची तपासणी बाहेरून करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. २०१४ मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना हे रूग्णालय शासनाकडे वर्ग करावे, असे सुचवले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रस्तावास अनुकूलता दर्शविली होती. पण, तो प्रस्ताव पुढे गेला नाही असेही ते म्हणाले. सुतिकागृहात गरोदर महिला खुर्चीवर बसलेल्या असतात. तिथेच रक्तस्राव होऊन अनेक गर्भवती दगावतात. जितो संस्थेला कॅन्सर युनिट देता. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची ताबा देता. त्याच्यातले काही कोटी रुपये जर कळवा रुग्णालयाला दिले तर अनेक गरिबांचे जीव वाचतील आणि आपल्या पदरात पुण्य पडेल. चुकीच्या माणसांच्या हातात रूग्णालय आणि परिवहन सेवा गेल्याने ही दुर्दशा झाली आहे, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-गर्दुल्ल्यांच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास; डोंबिवली, कल्याणचे प्रवासी त्रस्त

हवामान वाईट असताना हेलिकॉप्टरने प्रवास करू नये. हा साधारण जगभरातला अलिखित नियम आहे. हवामान खराब असल्यानेच आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री वैयक्तिकरित्या ‘मुख्यमंत्री’ म्हणून माझ्याशी कसेही वागत असतात, ती त्यांची राजकीय भूमिका आहे. पण, ते आधी माझे मित्र होते. त्यांनी हवामान खात्याचा हिरवा कंदील नसताना हेलिकॉप्टरने उड्डाण करू नये. ते जीवघेणे ठरू शकते. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्री ज्या मार्गाने साताऱ्याकडे गेले. त्या मार्गात सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. जर धुक्यामुळे डोंगररांग दिसली नाही तर अनर्थ घडू शकतो. म्हणून त्यांनी अशी कृती करू नये, अशी आपली विनंती आहे, असेही आव्हाड म्हणाले.