ठाणे : ठाण्याचे भाजपाचे आमदार संजय केळकर हे माॅरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘हृदयगंम-मराठी साहित्य संमेलनात ‘स्वराज्य निष्ठा’ या नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. तर, प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. केळकर यांनी यापूर्वी विवेकानंद यांच्यावरील नाटकात रामकृष्ण परमहंस यांची भूमिका साकारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २ व ३ डिसेंबरला आंतरराष्ट्रीयस्तरीय ‘हृदयगंम – मराठी साहित्य संमेलन’ माॅरिशस येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळीखास माॅरिशसमधील मराठी भाषिकांसाठी ‘स्वराज्य निष्ठा’ या नाटकाचा पहिलाच प्रयोग सादर केला जाणार आहे. लेखक, दिग्दर्शक राजन बने यांच्या दिग्दर्शनाखाली आमदार संजय केळकर हे छत्रपती शिवाजी महाराज व प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत.

हेही वाचा – अवकाळी पावसाने पीक हानी, फडणवीस म्हणाले…

मी मुळात कलासरगमचा कलाकार. सुरुवातीला काही नाटकांत भाग घेतला होता. पण विवेकानंद यांच्यावरील नाटकात रामकृष्ण परमहंस यांची मी केलेली भूमिका प्रचंड गाजली. २२५ प्रयोग मराठीत झाले व हिंदीत सहा प्रयोग झाले. ही भूमिका अध्यात्मिक स्वरुपाची होती. आता साक्षात शिवछत्रपतींची भूमिका साकारण्याचा योग आला आहे. अनेक मान्यवरांनी शिवछत्रपतींची भूमिका गाजविली आहे. हे शिवधनुष्य मीही आता उचलणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा विश्वस्त व कोकण कला अकादमीचा प्रमुख म्हणून माॅरिशस येथे मराठी साहित्य संमेलनासाठी जात असताना माॅरिशसमधील शिवभक्त मराठी भाषिकांसमोर शिवछत्रपतींची भूमिका साक्षात जगणार आहे, असे आमदार संजय केळकर म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ : शिर्डीच्या साई संस्थानकडून ‘एमआरआय’ मशीन खरेदीसाठी १३ कोटींची मदत, पण…

या नाटकात जिजामाता यांच्या भूमिकेत डाॅ. हर्षला लिखिते, सोयराबाई- वैदेही कोलंबकर, हंबीरराव- सुशील वाघुले, दिलेरखान- अमित मोरे, अनाजीपंत- डाॅ. जे. बी. भोर, मुशर्रफखान- राहूल निळे, शाहीर- आकाश ढवळ, नर्तकी- डाॅ. प्रांजल ढवळ, कलाकार- सीमा हर्डीकर तर औरंगजेबाची भूमिका राजन बने हे साकारणार आहेत. या नाटकाचे सहदिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू हे आहेत. पार्श्वसंगीत वैभव पटवर्धन यांनी दिले आहे तर ध्वनी व संवाद प्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस यांनी दिले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla from thane will play the role of chhatrapati shivaji maharaj in mauritius ssb