“राज्यासह ठाणे शहरातील गृहसंकुलाच्या आवारात नागरी सोयीसुविधांची कामे करण्यासाठी आमदार निधी वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या आले असून या निर्णयाचा राज्यातील सुमारे तीन लाख तर ठाण्यातील ३० हजार गृहसकुलांना फायदा होणार आहे.”, अशी माहिती भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी आज (शुक्रवार) पत्रकारांशी बोलताना दिली.

“शहरांमध्ये आमदार निधीतून नागरी सोयीसुविधांसाठी विविध कामे करण्यात येतात. सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणीच हा निधी वापरण्यात येतो. परंतु गृहसंकुलाच्या आवराचा परिसर खासगी क्षेत्रात येत असल्यामुळे येथे आमदार निधीतून नागरी कामे करता येत नाहीत. गृहसंकुलात राहणारे नागरिक हे मतदार असतात आणि या संकुलांकडे आवारात नागरी कामे करण्यासाठी पुरेसा निधी नसतो. त्यामुळे ते सोयीसुविधापासून वंचित राहतात. त्यामुळे गृहसंकुलाच्या आवारात नागरी सोयीसुविधांची कामे करण्यासाठी आमदार निधी वापरण्यास परवानगी देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती.”, अशी माहिती आमदार केळकर यांनी दिली.

तसेच, “गेली चार वर्षे हा पाठपुरावा सुरू होता. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अखेर यासंबंधीचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे तीन लाख तर ठाण्यातील ३० हजार गृहसकुलांना फायदा होणार आहे.”, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader