लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याण : कल्याण पूर्व शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सोमवारी सकाळी कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कळल्याने समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.

महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून काही धर्मस्थळांमध्ये प्रार्थना केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून शहरप्रमुख महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून दिली जात होती. त्यामुळे समर्थकांची चिंता वाढली होती.

आणखी वाचा-उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, न्यायालय परिसरात आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

सोमवारी सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महेश यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीची रुग्णालयातील प्रतीमा प्रसारीत झाली आहे. यामध्ये महेश गायकवाड खासदारांशी बोलत असल्याचे दिसत आहे. ही प्रतीमा पाहून कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

हिललाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून एकत्र जमले असताना मुलाला मारहाण झाल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी स्वसंरक्षणाचे कारण सांगून महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी गोळीबार केला होता. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. महेश यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

आणखी वाचा-छत्तीसगड येथील चार वेठबिगारांची ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सुटका

राहुल पाटील हा अंबरनाथ येथील बैलगाडा शर्यत प्रकरणातील आरोपी आहे. चैनू जाधव हा नेवाळी पोलीस हल्ला प्रकरणातील आरोपी आहे. आमदार गायकवाड, महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये बहुतांश गन्हेगार मंडळींचा अधिक भरणा असल्याचे या घटनेनंतर उघडकीला आले आहे. गुन्हेगार असूनही राजकीय वरदहस्तामुळे आरोपी मंडळी बिनधास्तपणे पोलिसांसमोर दांडगाई करत असल्याच्या तक्रारी आहेत.