लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण – कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना बुधवारी सकाळी उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्यासह सहकारी पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गायकवाड आणि आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

leopard stuck in a tree in Rajapur, Rajapur leopard, Ratnagiri,
रत्नागिरी : राजापुरात झाडावर अडकलेल्या बिबट्याला सोडविण्यास वन विभागाला यश
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Morning walk of tiger family in Pench tiger project video goes viral
‘मॉर्निंग वॉक’ करताय! पण वाघाचे कुटुंब…
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
sawantwadi tree cut
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील वृक्षतोड रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’ समिती स्थापन
Kolhapur rain paddy crops
Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका
temple Goregaon Mulund road, temple removed Goregaon Mulund road,
गोरेगाव मुलुंड जोडरस्त्याआड आलेले ४० वर्षे जुने मंदिर हटवले, पालिकेच्या विभाग कार्यालयाची कारवाई
sangli grape farms damaged
Sangli Rain News: पावसाचा धुमाकूळ सुरूच; द्राक्षबागांना फटका

आमदार गायकवाड यांच्या ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी नऊ वाजता आमदार गणपत गायकवाड, त्यांचे सहकारी आरोपी हर्षल केणे, दिव्येश उर्फ विक्की गणात्रा, माध्यम प्रमुख संदीप सरवणकर, वाहन चालक रणजित यादव यांना कडक पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर न्यायालयात हजर केले.

आणखी वाचा-डोंबिवली : वर्दळीच्या फडके रोडवर दोन रांगांमध्ये दुचाकींचे बेकायदा वाहनतळ

हे प्रकरण राजकीय आणि गंभीर असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी रात्रीपासून विशेष खबरदारी घेतली होती. बुधवारी सकाळी नऊ वाजता आमदार गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी आमदार गायकवाड यांच्यासह आरोपींची पोलीस कोठडी वाढून देण्याची मागणी केली. या प्रकरणाचा तपास योग्यरितीने सुरू आहे. तसेच आरोपी तपासाला पूर्ण सहकार्य करत असल्याचे आरोपींच्या वकिलांतर्फे ॲड. नीलेश पांडे, ॲड. समीर विसपुते, ॲड. राहुल गोडसे यांनी न्यायालयाला सांगितले. नवीन मुद्दे तपास अधिकाऱ्यांकडून समोर आले नाहीत. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन आमदार गायकवाड यांच्यासह चार आरोपींना न्यायालयीत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपपत्र दाखल होईपर्यंत ही कोठडी वाढत जाईल. तपास अधिकारी या प्रकरणाचा योग्यरितीने तपास करत आहेत. आता आरोपींना तुरुंग प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे ॲड. नीलेश पांडे यांनी सांगितले. गोळीबार प्रकरणातील आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव, नागेश बढेकर हे आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

आणखी वाचा-शिळफाटा उड्डाणपुलावरील पनवेल मार्गिकेचे लोकार्पण, जेएनपीटीसह ठाणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार

कडक बंदोबस्त

आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमख महेश गायकवाड यांच्या मधील वादाचे हे प्रसंग असल्याने पोलिसांनी आमदार गायकवाड यांना बुधवारी न्यायालयात आणताना विशेष खबरदारी घेतली होती. गेल्या दहा दिवसापूर्वी गोळीबाराची घटना घडल्यानंतर आमदार गायकवाड यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयात त्यांच्या चाहत्यांची गर्दी होती. भाजप समर्थकांनी न्यायालया बाहेर घोषणाबाजी केली होती. हे तणावाचे प्रसंग टाळण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून पोलिसांनी उल्हासनगर न्यायालया पासून २०० मीटर परिसरात जमावबंद आदेश लागू केला होता. न्यायलाय परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. विशेष पोलीस सुरक्षा न्यायालया बाहेर तैनात होती.

न्यायालयीन कामकाजाजी वेळ, नागरिकांची न्यायालयातील गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बुधवारी सकाळी आमदार गायकवाड यांना न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजुचे युक्तिवाद झाल्यानंतर आमदार गायकवाड यांची तळोजा कारागृहात कडक बंदोबस्तात रवानगी करण्यात आली.