ठाणे : मुख्यमंत्री साहेब, तुम्ही माझ्या मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु अजून थोडा निधी बाकी आहे. नुसता अंगठा दाखवून चालणार नाही. मी दुसरे काही मागितले नाही. निधी मागितला आहे, तो देखील जनतेसाठी, त्यामुळे निधी द्यायलाच लागेल असे विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. सरनाईक यांच्या निधीच्या मागणीनंतर शिंदे यांनी थेट सरनाईक यांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखविली. त्यामुळे एकच हशा पिकली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ओवळा माजिवडा मतदारसंघातील विविध वास्तूंचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक उपस्थित होते. त्यावेळी सरनाईक यांनी भाषणात थेट मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार मुख्यमंत्री म्हणून परिचित आहेत. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही माझ्या मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु अजून थोडा बाकी आहे. यावर शिंदे यांनी त्यांना अंगठा दाखविला. त्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले, साहेब नुसता अंगठा दाखवून चालणार नाही. मी दुसरे काही मागितले नाही. निधी मागितला आहे, तो देखील जनतेसाठी, त्यामुळे निधी द्यायलाच लागेल असे वक्तव्य केले. तसेच नरेश म्हस्के यांना मुख्यमंत्र्यांना जर ‘मस्का’ लावा अशी विनंती देखील केली. या वक्तव्यानंतर एकच हशा पिकली.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

हेही वाचा – ठाणे : लग्न जुळविणाऱ्या ॲपच्या माध्यमातून ओळख, अन् ९५ हजारांची फसवणूक

हेही वाचा – घरी बसलेले आता रस्त्यावर उतरले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. शिंदे यांनी सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रातील निधीची यादी वाचून दाखवित. इतका पैसा दिला तरी अजून मागतात असे शिंदे म्हणाले. नगरविकासचा पैसा यांना जास्त दिला आहे. दोन वर्षांपूर्वी गुवाहाटीला असताना सरनाईक यांनी अनेक फाईल आणल्या होत्या. त्यावेळी त्यांना नकार देता येत नव्हता. सरनाईक हे खूप हुषार आहेत असाही उल्लेख शिंदे यांनी केला.