कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका रिक्षा चालकाबरोबर एका महिलेचे भाडे देण्यावरुन भांडण झाले. रस्त्यावर भांडण झाल्याने प्रवासी महिला, एक रिक्षा चालक यांना पोलिसांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणले. या महिलेने मला पोलीस ठाण्यात का आणले आहे. असे बोलून उपस्थित महिला पोलिसांना शिवीगाळ, त्यांना मारायला धावण्याचे प्रकार केले. आपण एका आमदाराची बहीण आहोत. तुम्हाला सगळ्यांना बघू घेते, अशी धमकी या महिलेने रिक्षाचालक, पोलिसांना दिली.

हेही वाचा- ठाणे खाडीत फ्लेमिंगोची लगबग; ७० हजार ते १ लाख फ्लेमिंगोचे आगमन

pune after womans murder at bpo police issued an sop for womens safety in it companies
‘आयटी’ कंपनीतील महिलांच्या सुरक्षेसाठी नियमावली, नियमावलीचे पालन करणे बंधनकारक; पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Rickshaw driver arrested , molesting woman ,
पुणे : प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत

महात्मा फुले पोलीस ठाण्यात बुधवारी हा गोंधळ या महिलेने घातला होता. या महिलेला पोलिसांनी तिचे नाव विचारले तर ‘तुम्ही मला नाव विचारणारे कोण, तुमची लायकी आहे का मला काही विचारण्याची. तुम्ही मला शांत राहण्यास सांगणारे कोण’ असे अर्वाच्च भाषेतील प्रश्न उपस्थित करुन महिलेने महिला पोलिसांना मारहाण करण्यास धावणे, त्यांना शिवीगाळ केली आणि नखांनी बोचकारे घेतले. उपस्थित रिक्षा चालकाला शिवीगाळ करणे असे प्रकार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा- भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

एक तास चाललेल्या या गोंधळानंतर महिलेने आपले नाव प्रीती कपील त्रिभुवन (३२, रा. इंदिरानगर, कल्याण) असे सांगितले. अतिशय संतप्त झालेल्या महिलेला इतर महिला पोलीस शांत राहण्यास सांगत होत्या. त्यांचेही प्रीती ऐकत नव्हती. त्यांना ती मारहाण करण्यास धावत होती. श्रीकांत मिश्रा या रिक्षा चालकाबरोबर तिचा वाद झाला होता. तो रिक्षाचालक पोलीस ठाण्यात उपस्थित होता. मिश्राची तक्रार करण्याऐवजी महिलेने रिक्षा चालकाला फैलावर घेऊन तुझ्यामुळे मला पोलीस ठाण्यात यावे लागले. मला मनस्ताप झाला, असे ओरडून बोलू लागली. अखेर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी पोलीस वाहनात बसताना या महिलेने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या महिलेला पाहण्यासाठी पादचाऱ्यांनी गर्दी केली होती. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून महिला पोलीस शीला अंकुश बंदावणे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी प्रीती विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Story img Loader