जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील विकासकामांना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) गती दिली जात असतानाच, मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघासाठीही एमएमआरडीएने हात सैल केला आहे. कल्याण मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांसाठी प्राधिकरणाने ११ हजार कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन केले आहे.

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
review of the development works was presented in the campaign of the candidate in Byculla Mumbai news
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

ठाणे शहर, भिवंडी, घोडबंदर तसेच लगतच्या परिसरासाठी पायाभूत सुविधांचे अनेक महत्वाचे प्रकल्प आखले जात असताना लगतच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, शिळफाटा, कल्याण, डोंबिवली या शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची आखणी केली आहे. 

एमएमआरडीएने या प्रकल्पांसाठी सुसाध्यता अहवाल तयार करण्याच्या एका प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिघातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असताना कल्याण, डोंबिवली, शिळफाटा या भागातही मोठया वाहतूक प्रकल्पांची आखणी केल्याशिवाय पर्याय नसल्याची स्पष्ट मांडणी एमएमआरडीएने केली आहे. त्यामुळेच आगामी काळात ऐरोली नाका ते काटई नाका रोड, शिळफाटा ते माणकोली, कल्याण ते माणकोली (बापगाव), कल्याण-एनआरसी- टिटवाळा अशा मोठय़ा वाहतूक प्रकल्पांची आखणी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे.

प्रकल्प कोणते?

* टिटवाळा-पडघा रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण

* नवी मुंबईतील महापे ते दहीसरदरम्यान दोन स्वतंत्र बोगदे

* दहीसर गाव ते मुरबाडदरम्यान नवा रस्ता

* टिटवाळा ते बदलापूरदरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण

* खारेगाव ते पडघा या रस्त्याचे काँक्रीटीकरण

* कल्याण-एनआरसी-टिटवाळा दरम्यान तीन ते चार पदरी रस्त्याचे कॅाक्रिटीकरण

* कल्याण ते माणकोली (बापगाव), शीळफाटा ते माणकोली, ऐरोली बोगदा ते काटई नाका वाहतूक प्रकल्प.