जयेश सामंत, नीलेश पानमंद

‘बांधकाम विकास हस्तांतर हक्क’ देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव नामंजूर

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
students Islamic organization sio
‘एसआयओ’तर्फे विद्यार्थ्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध; विविध शैक्षणिक, सामाजिक, रोजगार, पर्यावरण संवर्धनाशी संबंधित मागण्यांवर भर
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

वाहतूक कोंडीचे आगार ठरू पाहणाऱ्या घोडबंदर मार्गाला पर्याय म्हणून खाडीकिनारी समांतर रस्ता तयार करण्यासाठी कंत्राटदाराला बांधकाम हस्तांतर विकास हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) देऊन २०० कोटींचा निधी उभारण्याचा ठाणे महापालिकेचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) फेटाळला आहे. त्याऐवजी आपल्या तिजोरीतून ३५० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवताना पालिकेने भूसंपादनापर्यंतची प्रक्रिया पूर्ण केल्यास ५० टक्के निधी देण्याची अट प्राधिकरणाने घातली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गास जोडरस्ता असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांत अवजड वाहनांचा भार वाढला आहे. सद्य:स्थितीत या भागातील वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद हा एकमेव मार्ग असून तो वाहनसंख्येच्या तुलनेत अपुरा आहे. एमएमआरडीएने याच मार्गावर ठाणे मेट्रोचे काम सुरू केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तरी घोडबंदर मार्गावरील वाहनभार कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे एमएमआरडीएने २००७ मध्ये घोडबंदर मार्गाला पर्याय म्हणून खाडी किनारा मार्गाचा प्रकल्प आखला.

रस्त्यासाठीचा खर्च बांधीव विकास हस्तांतर हक्काच्या माध्यमातून उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने महिनाभरापूर्वी एमएमआरडीएला सादर केला होता. ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत काही महत्त्वाचे रस्ते कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून विकसित करण्यात आले असून हीच पद्धत खाडी मार्गासाठी वापरता येईल, असा महापालिकेचा प्रस्ताव होता. त्यानुसार कंत्राटदाराला वाढीव चटई क्षेत्र बहाल करून तब्बल २०० कोटी रुपये या प्रकल्पासाठी उभे करता येतील तसेच उर्वरित १५० कोटी रुपयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाईल, असा प्रस्ताव महापालिकेने सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव प्राधिकरणाने सध्या तरी नाकारला असून संपूर्ण ३५० कोटी रुपये आपल्या निधीतून खर्च केले जातील, असे कळविले आहे.

उन्नत आणि भुयारी रस्ता

महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने मूळ प्रकल्पाच्या रचनेत काही बदल सुचविले आहेत. हा मार्ग काही ठिकाणी उन्नत असणार असेल. संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येणारा भाग सुरक्षिततेच्या दृष्टीने भुयारी स्वरूपात असावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

रस्त्याचे प्राथमिक सर्वेक्षण आणि नकाशे तयार करणे, फेरबदल सुचविल्यास त्या भागाचे सर्वेक्षण करणे, भूसंपादनासाठी महसूल व इतर विभागांकडून कागदपत्रे मिळविणे अशा कामांसाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.

रस्त्याचे स्वरूप

* लांबी : १५ किलोमीटर

* रुंदी : ४०.४५ मीटर

* मुंबई-अहमदाबाद महामार्गाला समांतर