ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबविली आणि नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत विविध रस्ते प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय हे तातडीने मार्गी लावण्याची तयारी ठाणे महापालिका प्रशासनाने दाखविली आहे. यामुळे या रस्ते प्रकल्पांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या शहरातील कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रस्ते प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांकरिता आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्याची जबाबदारी संबंधित महापालिकांवर आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडी पूल, कासारवडवली ते खारबाव खाडी पूल, कोलशेत ते काल्हेर खाडी पूल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग असे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहायक संचालक नगररचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जल-मल वाहिन्यांचे स्थलांतरण यावर या बैठकीत चर्चा झाली.

mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
MIDC plot for old age home for artists thane news
‘एमआयडीसी’चा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी;उद्याोगमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
mmrda loksatta
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द
local express train got disrupted due to traffic jam at diva railway crossing gate
दिवा रेल्वे फाटकातील वाहन कोंडीमुळे  लोकल, एक्सप्रेस खोळंबल्या; शिळफाटा वाहन कोंडीत
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Image of Elon Musk, Chris Anderson, or a related graphic
Elon Musk : “तुमच्या पोस्ट्समुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो”, TED Talks च्या प्रमुखांनी एलॉन मस्क यांना फटकारले
panvel grp constable death
शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं

हेही वाचा >>> ‘एमआयडीसी’चा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी;उद्याोगमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

भूसंपादनाच्या खर्चासाठी निधीची मागणी

ऐरोली ते कटाई नाका या उन्नत रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेसाठी भूसंपादन करण्याचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, तसेच या वाढीव भूसंपादनाच्या खर्चासाठी निधीची मागणी करण्यासाठी सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ऐरोली ते कटाई या रस्त्यासाठी १२.५९ हेक्टर जागेचे संपादन ठाणे महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी मूळ प्रस्ताव २५३ कोटी रुपयांचा होता. त्यात वाढ होऊन आणखी जागा किती लागेल, तसेच त्याचा खर्च किती येईल यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर, भूसंपादन आणि वाढीव खर्च या दोन्हींचे सुधारित प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा >>> ठाण्यात शैक्षणिक संस्थेकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक

घोडबंदर रस्ता एकत्रीकरण

घोडबंदरचा मुख्य आणि सेवा रस्ता एकत्रिकरण करण्याच्या प्रकल्पात महावितरणच्या वीज वाहिन्यांचे स्थलांतरण हे मोठे आव्हानात्मक काम असेल. या वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी महावितरण, एमएमआरडीए आणि ठाणे महापालिकेने पुढील आठ दिवसात एकत्रित सर्वेक्षण करावे. तसेच या स्थलांतरणाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

सुरक्षा अनामत रकमेबाबत सवलत

नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर, वृक्ष कापणीसाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा अनामत रकमेत एमएमआरडीएला सवलत देण्यासाठी कायद्याचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उद्यान विभागाला दिले. त्याचप्रमाणे, बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, नवीन झाडे लावणे ही कामेही ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात येतील. त्यासाठी लागणारा खर्च एमएमआरडीएकडून दिला जाईल, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज आठ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. ठाणे महापालिकेच्या मल-जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्पासाठी देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच, अमृत जल योजनेअंतर्गत १५०० एमएम आकाराच्या जलवाहिनीच्या मार्ग स्थलांतराबाबतही आजच्या बैठकीत निर्देश देण्यात आले.

गायमुख ते पायेगाव खाडीपूल

गायमुख ते पायेगाव या खाडी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी भूसंपादन, सीआरझेड वनविभाग अधिक क्षेत्राचा विस्तृत आराखडा पंधरा दिवसात तयार करण्यात यावा, असे निर्देश अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिले एमएमआरडीए मार्फत रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत.

या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय आदी गोष्टींबाबत ठाणे महापालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल- महापालिका आयुक्त सौरभ राव

Story img Loader