कर्नाटकात काँगेसच्या विजयात त्यांना भारत जोडो यात्रेचा फायदा झाला असे सांगत हा भाजपचा पराभव असून आपले कुणीही वाकडे करू शकत नाही या भावनेचा, भाजपच्या या स्वभावाचा आणि वागणुकीचा हा पराभव असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. अंबरनाथ येथे पदाधिकारी मेळाव्यानिमित्त ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
हेही वाचा >>> ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटक विजयानंतर केला जल्लोष
रविवारी राज ठाकरे यांनी अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांना भेट दिली. यावेळी त्यांनी पाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्ष संघटना आणि पक्ष बांधणी बाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच पक्षात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यावेळी अंबरनाथ शहरात पदाधिकारी मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील शिवसैनिकाची उल्हासनगरमधील पती-पत्नीकडून २२ लाखाची फसवणूक
विरोधक जिंकत नसतात तर सत्ताधारी पराभूत होत असतात, असे सांगत त्यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली. कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला त्यांना भारत जोडो यात्रेचा फायदा झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र हा पराभव त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या वागणुकीचा आहे. आपले कुणीही वाकडे करू शकत नाही हा त्यांचा विचार आहे त्याचा हा पराभव आहे, असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली. लोकशाहीत लोकांना गृहीत धरू नये, हे सांगणारा हा निकाल आहे. त्यातून सर्वच पक्षांनी बोध घ्यावा असाही टोला यावेळी राज ठाकरे यांनी लगावला.