ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे उद्या, गुरूवारी ठाणे शहराच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यादरम्यान ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय, सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. मनसेकडूनही अशाप्रकारची तयारी सुरू आहे. असे असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे गुरूवारी सकाळी ९ वाजता ठाणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यामध्ये आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray will visit thane tomorrow thane amy
Show comments