ठाणे : टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून मनसेचे मुलुंड टोलनाक्याजवळ उपोषण सुरू आहे. या उपोषणास मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने टोल दरवाढ रद्द करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर १ ऑक्टोबरपासून लागू केलेल्या टोल दरवाढीविरोधात मनसेने ३० सप्टेंबरपासून विविध मार्गाने आंदोलन केले. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मनसेच्यावतीने आनंदनगर येथे मानवी साखळी तयार करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात मनसेने ठाण्यातील विविध चौकांत निदर्शने करून नागरिकांमध्ये टोल दरवाढीबाबत जनजागृती केली होती. तसेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन आंदोलन केले होते.

हेही वाचा – ठाण्यात रुंद रस्ते पार्किंगसाठी आंदण? रुंदीकरणानंतरही कोंडी कायम

हेही वाचा – बदलापूर: पालिका मुख्यालयाबाहेरच खड्ड्यांची आरास

तिसऱ्या टप्प्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह १० ते १५ पदाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून आनंदनगर टोलनाका येथे उपोषण सुरू केले आहे. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी हे उपोषण सुरू आहे. या उपोषणामध्ये मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर, निलेश चव्हाण, महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंद्ये, उपशहर प्रमुख पुष्कर विचारे, सुशांत सूर्यराव, मनोहर चव्हाण, विश्वजित जाधव, करण खरे हे मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns continues hunger strike in thane against toll rate hike third day of fasting ssb
Show comments