ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराअभावी सहा रुग्णांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, गेल्या १२ तासांत म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत रुग्णालयात आणखी १६ ते १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार समोर येताच अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांनीही तत्काळ कळवा रुग्णालय गाठून प्रशासनाला जाब विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> कळवा रुग्णालयात १२ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू; शेवटच्या क्षणी दाखल केल्याचा प्रशासनानं दावा!

“कळवा रुग्णालयात आजच्या घडीला मृत्यूचा तांडव सुरू आहे. या तांडवाला प्रशासन आणि आयुक्त जबाबदार आहेत. ज्या पद्धतीने रुग्ण मरतात, हे सांगतात की रुग्ण अतिगंभीर झाल्यावर दाखल होतात. काल (१२ जुलै) एक महिला रुग्ण चालत रुग्णालयात आली आणि आज गंभीर झाली. याचा अर्थ कळवा रुग्णालयात डॉक्टर लक्ष देत नाहीत. म्हणूनच रुग्ण मरत आहेत. आणि हे येथे मरायला सोडलेले आहेत. हे मृत्यूचं तांडव थांबलं पाहिजे. नाहीतर ठाण्यात सर्व प्रशासनाला भोगावं लागेल हे नक्की”, असा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला आहे.

“एखादा रुग्ण आल्यावर गंभीर होतो, पण ज्युपिटरला गेल्यावर रुग्ण वाचतो. कळवा हॉस्पिटलला आल्यानंतर फक्त श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून रुग्ण सिरीअस होतो. व्यवस्था नीट नाही, प्रशासनाची वाट लागली आहे, म्हणून या गोष्टी घडत आहेत”, असंही अविनाश जाधव म्हणाले.

“सिव्हील रुग्णालय बंद पडल्याने या रग्णालयावर लोड आला आहे. पण पावसाळा आहे, रुग्ण येणार, याची तयारी व्हायला हवी होती. हे दरवर्षीचं आहे. ज्या गोष्टींची गरज आहे, त्या सुविधा देता येत नाहीत. कळवा रुग्णालयात येणारे रुग्ण कोण आहेत? रिक्षा चालवणारे, टॅक्सी चालवणारे, भांडी घासणारे. त्यांनाच उपचार करू शकला नाहीत तर उपयोग काय, उद्या आयुक्तांना आम्ही जाब विचारणार आहोत, असा इशाराही जाधव यांनी दिला.

आयुक्तांनी जबाबदारी घ्यावी

मृत्यूचे जबाबदार ठाणे महापालिकेचे आयुक्त असले पाहिजेत. कारण ठाण्यात एखादी चांगली घटना घडली की परदेशात जाऊन पुरस्कार कोण घेतो, आयुक्तच घेतो ना. मग ठाण्यात वाईट होतं, त्याची जबाबदारीही आयुक्तांनीच घेतली पाहिजे. या मृत्यूची जबाबादरी आयुक्तांनी घ्यावी, असंही अविनाश जाधव म्हणाले. तसंच, उद्या आयुक्तांच्या आयुक्तांच्या केबिनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवेल की काय करणार आहे, असंही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns is aggressive in the death of 16 people in kalwa hospital death spree in kalwa patients to die sgk
Show comments