लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंब्रा येथे फळ विक्रेत्याला एका तरुणाने मराठी बोल असे म्हटल्यानंतर तरुणालाच माफी मागायला लावण्यात आली आहे. या प्रकारवरून आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात असताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक पोस्ट केली आहे.

Mumbra Marathi Language Dispute in Marathi
Mumbra Marathi Language Controversy: “…तर चौकाचौकात मराठी माणसाला मारलं जाईल”, मुंब्र्यातील ‘त्या’ प्रकारावरून मनसेची आगपाखड; दिला इशारा!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Amitabh bachchan post about ratan tata death
एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स

डायघर भागात राहणारा २१ वर्षीय मुलगा गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागात फळविक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठी बोला असे तो तरुण फळ विक्रेत्याला म्हणाला. त्यामुळे फळ विक्रेता आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलाविले. ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. तसेच तो माफी मागत असल्याचे चित्रीकरणही प्रसारित केले. या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. तसेच त्या तरुणाविरोधात त्याने तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी तरुणा विरोधात घोषणाबाजी केली.

आणखी वाचा-मराठी बोलण्यास सांगितल्याने तरुणाला कान पकडून माफी मागण्यास पाडले भाग

तरुणाविरोधात शिवीगाळ आणि धमकाविल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही तरुण माफी मागत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करत प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा काय म्हणाले अविनाश जाधव

‘मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागतीये तेही महाराष्ट्रात! हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार, आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याच साठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते… आता भोगा कर्माची फळ…’ असे त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

Story img Loader