लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण – कल्याण लोकसभेच्या अंतर्गत सहा विधानसभा येतात. या विधानसभा क्षेत्रातील आमदारांशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कसे वागतात, हा विचार केला तर कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड काहीही चूक बोलले नाहीत, अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी आमदार गायकवाड यांची पाठराखण करून खासदार डॉक्टर शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
devendra fadanvis
महायुतीच्या आमदारांची रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट
BJPs attempt to balance power in ahilyanagar with elect Ram Shinde As Speaker of Legislative Council
राम शिंदे यांच्या निवडीने जिल्ह्यात सत्ता समतोलाचा भाजपचा प्रयत्न
Senior BJP leader Pankaja Munde absent in Smriti Mandir
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची स्मृती मंदिर परिसरात दांडी..
Pramod Gharde Rebel Candidate, Pramod Gharde Welcome banner,
भाजप बंडखोराने लावले फडणवीसांचे स्वागत फलक, बावनकुळेंचेही छायाचित्र
Ajit Pawar, RSS , Ajit Pawar latest news,
महायुतीचे आमदार गुरुवारी ‘आरएसएस’ स्थळी भेट देणार, अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
sanjay gaikwad
बुलढाणा : ‘त्या’ आठ नेत्यांविरुद्ध हाय कमांडकडे तक्रारी, ‘या’ आमदारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ….

मागील काही वर्षापासून शिंदे- पाटील यांच्यात जोरदार राजकीय धुसफूस सुरू आहे. राज्याच्या सत्तेमध्ये एक असलेले शिवसेना-भाजपचे दोन लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर एकमेकाची उणीदुणी काढत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता तर लोकांचे मनोरंजन होत आहे.

कल्याण, भिवंडी लोकसभेत भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असे वक्तव्य करून आमदार गायकवाड यांनी पहिले शिवसेनेला डिवचले होते. यावरून खासदार डाॅक्टर शिंदे यांनी ‘लोकांनी दिलेली जबाबदारी पार पाडताना आपली दमछाक होत आहे. त्यामुळे अशा वक्तव्यांकडे लक्ष देण्यास मला वेळ नाही. अशी वक्तव्ये फुकटची प्रसिध्दी मिळविण्यासाठी केलेली असतात. मनोरंजन म्हणून अशी व्यक्तव्ये बघायची असतात,’ असे विधान करून खासदार शिंदे यांनी आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याची आपण फार गंभीर दखल घेत नसल्याचे दाखवून दिले होते.

आणखी वाचा-…तर स्वच्छतेसाठी पंतप्रधान मोदींनी झाडू मारायचा का?

या वक्तव्यानंतर आमदार गायकवाड यांनी मंगळवारी पुन्हा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर टीका करणारे एक ट्विट केले. गद्दारी करून मिळालेल्या माप पैशातून यांना संपत्तीचा माज आला आहे. त्यामुळे यांना इतर जग विदूषकच दिसणार, असे आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.

पाटील यांची उडी

आमदार गायकवाड, खासदार शिंदे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला असतानाच, आता त्यात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यामध्ये उडी घेतली आहे. भाजपला चार राज्यात मिळालेल्या सत्तेवरून त्यांना बळ मिळाले आहे. बळ वाढले की ते मित्र पक्षाला योग्य जागा दाखवतात. त्याचप्रमाणे कल्याण, भिवंडी लोकसभेसाठी भाजपचे प्रयत्न होत असतील तर ते चूक नाही. त्यामुळे आमदार गायकवाड बोलले ते योग्यच बोलले, असे वक्तव्य आमदार पाटील यांनी केले.

आणखी वाचा-पैसे दे नाहीतर अश्लिल छायाचित्र प्रसारित करेन; मालकीनीला धमकावून खंडणी उकळणाऱ्या लेडिज टेलरला अटक

इतर पक्षाच्या आमदारांशी खासदार शिंदे कसे वागतात. कल्याण लोकसभेत सहा आमदार आहेत. त्यांच्या सूचना, विचारांचा विचार करून खासदारांनी काही कामे केली तर नक्कीच प्रत्येक मतदारसंघात कामे होऊन त्याचा लाभ खासदार शिंदे यांनाही होऊ शकतो. पण तसे ते वागत नाहीत. त्यामुळे आमदार गायकवाड काही चुकीचे बोलले नाही, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

आमदार गायकवाड यांना कल्याण पूर्वेत शह देण्यासाठी खासदार समर्थक कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड आगामी विधानसभेची तयारी करत आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे पाटील यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून महेश पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोन्ही इच्छुक खासदारांचे समर्थक असल्याने आमदार पाटील, आमदार गायकवाड यांनी खासदारांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

Story img Loader