विकास कामे, राजकीय खलबतांवरुन वेळवेळी आणि पदोपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांना पत्रे, फलकबाजी, ट्वीटच्या माध्यमातून लक्ष्य करणाऱ्या कल्याण ग्रामीणचे मनसेचे आ. प्रमोद पाटील यांनी शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, फुटीर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तात्पुरती परवानगी नाकरताच, मनसे. आ. पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चिमटा तर ठाकरे यांनाही शालजोडीतील देऊन त्यांचा कैवार घेतला आहे.
हेही वाचा >>>‘सोनोग्राफी’चा चुकीचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरविरुध्द गुन्हा
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन करण्यात मनसेचाही महत्वाचापूर्ण सहभाग होता. भाजपने आपल्या ‘डावा’साठी शिवसेना-मनसे तडजोड घडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समझोत्याचे अध्वर्यु होते. राज्यात सत्ता स्थापन होताच सुरुवातीचे दोन महिने मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी सरकार कसे चालते, काय काम करते आणि या सरकार स्थापनेत मनसेने महत्वपूर्ण योगदान दिल्याने मनसेला मंत्रीपद असेल असा विचार करुन शांत राहणे पसंत केले होते.
हेही वाचा >>>ठाणे : शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला उद्यापासून ठाण्यातून सुरुवात ; यात्रेननिमित्ताने जाहीर मेळाव्याचे आयोजन
दोन महिने उलटल्यानंतर मनसेला मंत्रीपद नाहीच, याऊलट मनसे आमदार पाटील यांच्या कल्याण ग्रामीण भागातील विकास कामे, शिळफाटा रस्ता, डोंबिवली शहरातील विकास कामे विषयावरुन मुख्यमंत्री पुत्र खासदार डाॅ. शिंदे यांनी पुन्हा आपल्या नेहमीच्या कुरबुरी सुरू केल्याने संतप्त झालेल्या आ. पाटील यांनी पुन्हा शिवसेना आणि मुख्यमंत्री, खासदार यांना ट्वीटरच्या माध्यमातून लक्ष्य करण्यास सुरुवात केले. त्याला शिवसेनेकडून तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याचे प्रकार मात्र थांबल्याने त्याचा पुरेपूर गैरफायदा आता मनसे घेत आहे. यापूर्वी आ. पाटील यांनी ट्वीट फलकबाजी केली की त्याला खासदार स्वत ट्वीट, फलकबाजीतून उत्तर देत होते. आता मनसेच्या फलकबाजी, ट्वीटला डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक, खासदार खंदे समर्थक दीपेश म्हात्रे, शहराध्यक्ष राजेश मोरे उत्तर देत आहेत. यापूर्वी ही कामे आक्रमकपणे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम करत होते. खासदारांनी थेट मनसेला उत्तर दिले तर पहा मुख्यमंत्री पुत्र खासदार कसे मनसेशी झुंजत आहेत असे चित्र राज्यात, देशात उभे राहिल या विचाराने आता खासदारांची स्थानिक फौज मनसे आ. पाटील यांना प्रतिउत्तर देत आहे.
या कुऱ्याबुऱ्या सुरू असतानुा शनिवारी निवडणूक आयोगाने मुंबईतील एका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे, शिंदे यांना तात्पुरत्या स्वरुपात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मज्जाव केला आहे. या निर्णयाचा पुरेपूर फायदा उठवत आ. प्रमोद पाटील यांनी ट्वीटर वरुन ‘ आमची निशाणी इंजिन, बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. त्यांची जर लगेच पक्षातून हकालपट्टी केली असती तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती. असो, तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही’ अशी टीपणी करुन भविष्यात काही घडले तर आम्ही तुमच्या साथीला आहोतच अशी सूचक सुप्त पुडी सोडली आहे. हा शिंदे गटाला मोठा इशारा मनसेने या ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील कामगाराचा मित्राकडून खून
शिंदे यांच्या बंडखोरी नंतर त्यांची तात्काळ हकालपट्टी केली असती तर आता ही पक्षाचे नाव व चिन्ह गमावण्याची वेळ आली नसती. ठीक आहे तरी आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही, असे सूचित करुन पुढेमागे आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी पुडी सोडून शिंदे गटाला इशारा तर ठाकरे यांचा कैवार घेतला आहे.
मनसे शहराध्यक्ष टीका
मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनीही शिवसेनेवर प्रहार करताना तुमच्याकडे काय आहे, असे म्हणत मनसेकडे चिन्ह इंजिन आणि पक्षाचे खणखणीत नाव आहे. तुमच्याकडे काय आहे आणि तुमचे पुढे कसे होणार. तर आमचे पुढे फशिवसेना आणि हशिवसेना होणार, असा संदेश प्रसारित करुन ठाकरे, शिंदे समर्थकांना टोले लगावले आहेत.
हेही वाचा >>> ठाण्यात व्यावसायिकावर गोळीबार
शिवसेनेचे प्रहार
रिंगरुटचा कोपर, भोपर महत्वाचा टप्पा मार्गी लागणार आहे. माणकोली पूल लवकरच पूर्ण होईल. भोपर भागातील अतिक्रमणे दूर होणे आवश्यक आहे. यासाठी एमएमआरडीएने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. डोंबिवलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहरावर प्रेम करणाऱ्या नेते, लोकप्रतिनिधींनी श्रेयाचे राजकारण न करता एकत्र येऊन ही कामे लवकर पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करावेत, असा चिमटा शनिवारी खासदार समर्थक उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी नाव न घेता आ. प्रमोद पाटील यांना घेतला आहे. त्याचे उट्टे त्यांनी तात्काळ काढले आहेत.