ठाणे : गेल्या काही दिवसांपासून शिळफाटा, कल्याणफाटा, महापे मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. या मुद्द्यावरून मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली. आपल्या सुपूत्राच्या मतदार संघात नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे, तर महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या ? कोंडी कमी करण्याच्यासाठी आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या. पाहिजे तर कोंडी कमी करण्याचे श्रेय तुमच्या पुत्राला घेऊ द्या..पण शिळफाट्याच्या कोंडीचा शिक्का पुसा, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिळफाटा, कल्याणफाटा भागात मोठ्याप्रमाणात गृहसंकुले उभी राहीली आहेत. तसेच येथील मार्गावरून बदलापूर, कल्याण, डोंबिवली भागातील हजारो वाहन चालक नवी मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत असतात. उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या अवजड वाहनांची वाहतुकही या मार्गावरून होत असते. वाहनांचा भार वाढल्याने तसेच विविध प्रकल्पांची कामे सुरू असल्याने दररोज वाहन चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच येथील एमआयडीसी मार्गावर ठाणे वाहतुक पोलिसांनी या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यामुळे सायंकाळी कोंडी होत आहे. दररोजच्या कोंडीवरून मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे यांच्यावर टिका करत प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले.

Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
Ravi Rana amravati unhappy, Ravi Rana latest news,
Ravi Rana : रवी राणांची नाराजी कायम; अधिवेशनात उपस्थित न राहता गोसेवेत व्यस्त
Tula Shikvin Changalach Dhada promo
भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी! सासूला खडेबोल सुनावून अक्षरा घर सोडून जाणार…; मास्तरीण बाईंना अधिपती म्हणाला…
Mallikarjun Kharge Vs Jagdeep Dhankhar
Mallikarjun Kharge Vs Jagdeep Dhankhar : ‘तुम्ही शेतकरी पुत्र असाल तर मी एका…’; राज्यसभेत खरगे अन् जगदीप धनखड यांच्यात खडाजंगी
Manoj Bajpayee on his interfaith marriage with shabana raza
वडिलांच्या अंत्यसंस्काराला हिंदूंपेक्षा जास्त मुस्लीम…, मनोज बाजपेयींचे आंतरधर्मीय लग्नाबाबत वक्तव्य; म्हणाले, “आता सत्तेत असलेल्या सरकारचे…”

हेही वाचा… आता अंबरनाथमध्येही सिग्नल यंत्रणा, कल्याण बदलापूर राज्यमार्गावर तीन ठिकाणी सिग्नल

हेही वाचा… ठाणे : दिवा स्थानकातून सीएसएमटी गाड्या सोडा, प्रवासी संघटनेची स्वाक्षरी मोहीम

‘शिळफाट्याच्या कोंडीने स्वत:चेच विक्रम मोडले. मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत. वाहतुक कोंडी सुटावी यासाठी नवनव्या ‘स्कीम’ घेऊन येतात. त्या ‘स्किम’ नसतातच. पाॅकेटमनीसाठी केलेला ‘स्कॅम’ असतो अशा चर्चा ठेकेदार वर्गात सुरू आहेत. गरोदर महिला, वृद्ध, रुग्ण सगळे तासन्-तास कोंडीला सामोरे जात आहेत. तेही आपल्या सुपूत्राच्या मतदार संघात? महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या असा प्रश्न पाटील यांनी केला. कधीतरी आमच्या सूचनांचा विचार करा, कदाचित वाहतुक कोंडी कमी होईल. हवे तर याचे श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या. पण एकदा आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या व शिळफाट्याच्या कोंडीचा शिक्का तेवढा पुसा, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला. त्यामुळे शिळफाट्याच्या कोंडीचा मुद्दा आता तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader