डोंबिवली– गणेशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेतील रस्ते सुस्थितीत केले जातील. एकही रस्त्यावर खड्डा राहणार नाही, अशा घोषणा पालिका अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. गणपती खड्डयातून आले आणि खड्ड्यातून गेले तरी पालिका हद्दीतील खड्डे बुजले नाहीत. भ्रष्ट पालिका अधिकारी आणि त्यांना सामील सत्ताधारी यांच्या अभद्र युतीमुळे शहरांना बकालपणा आला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सत्ताधाऱ्यांना खड्ड्यात गाडा, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उल्हासनगर : कलानींना आपल्याकडं वळविण्यासाठी शरद पवार गटाचं प्रयत्न, निवासस्थानी नेत्यांच्या भेटी

आमदार प्रमोद पाटील यांचा सोमवारी वाढदिवस असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना माझ्या वाढदिवसाचे फलक कोठेही लावू नका. अगोदर कल्याण, डोंबिवली शहरे कचरा, फलक, खड्डे, दुर्गंधी यांनी बकाल झाली आहेत. त्यात माझ्या वाढदिवसाचे फलक लावून तुम्ही त्यात का भर घालता. त्यापेक्षा माझ्या वाढदिवसाच्या फलकावर खर्च करण्यापेक्षा तो खर्च आपल्या भागातील एक ते दोन खड्डे बुजविण्यात खर्च करा, असे आवाहन त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत मद्यपी वडिलांकडून अल्पवयीन मतिमंद मुलीची हत्या

शहरातील बकालपणाविषयावर बोलताना त्यांनी सांगितले, पालिका प्रशासनातील अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. तरीही तात्पुरती मलमपट्टी करुन खड्डे भरण्यात आले. या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आता नगरसेवक नाहीत. त्यामुळे त्यांची मनमानी आणि पैसे खाण्याची एक खिडकी योजना जोरात सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. अधिकाऱ्यांच्या गैरकारभारात सत्ताधारी मंडळी सामील असतात. त्यामुळे अधिकारी मंडळी सत्ताधाऱ्यांना जुमानत नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या हात दगडाखाली असल्याने ते अधिकाऱ्यांना जाब विचारू शकत नाहीत. त्याचा त्रास नागरी समस्यांच्या माध्यमातून लोकांना होत आहे. तेव्हा या भ्रष्ट सत्ताधारी मंडळींना येत्या निवडणुकीत खड्ड्यात गाडून टाका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla raju patil slams corrupt kdmc officials and ruling parties leaders over potholes during ganpati festival zws
Show comments