लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी दुपारी साडे चार वाजता डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे येत आहेत. कल्याण ग्रामीणमधून मनसेतर्फे राजू पाटील हे एकमेव उमेदवारीचे दावेदार आहेत.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मनसेने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीसोबत युती केली होती. आता विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन महायुती सोबत न राहता आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या काळात महायुती सोबत असणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांचा सामना आता भाजप, शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असणार आहे.

आणखी वाचा-कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांच्या पत्नीला, उमेदवारी दिल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता

लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी झटून काम केले होते. कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीला नकारात्मक वातावरण असुनही स्थानिक शिवसेना कार्यकर्ते, आमदार पाटील यांनी झटून केलेल्या कामामुळे खा. शिंदे यांचे या भागातील मताधिक्य वाढले होते.

आता महायुतीमधून मनसे बाहेर पडल्याने राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमध्ये एकाकी लढत द्यावी लागणार आहे. या मतदारसंघात राजू पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत ते दिवा भागाने दिलेल्या साथीने सहा ते सात हजाराच्या फरकाने निवडून आले होते.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात महायुतीत बंडाचे वारे

आता राजू पाटील या मतदारसंघात मनसेचे दावेदार उमेदवार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि मनसेच्या मध्यवर्ति निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे सोमवारी दुपारी साडे चार वाजता डोंबिवलीत कल्याण-शिळफाट रस्त्यावरील मानपाडा येथील भागाशेठ वझे चौकात येत आहेत. यानिमित्ताने मनसेने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

राजू पाटील यांची लढत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर, शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात भाजपमधून कल्याण ग्रामीण प्रमुख नंदू परब उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

Story img Loader