महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीके केली होती. या टीकेमध्ये राज यांनी आव्हाडांचा चेहरा हा नागानं फणा काढावा असा असल्याचा टोला लगावलेला. या टीकेला उत्तर देताना आव्हाडांनी उत्तर देत, ” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का?”, असा प्रश्न विचारलेला. याच टीकेला आता मनसेनं उत्तर दिलं असून यामध्ये आता थेट राष्ट्रवादीच काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत टीका करण्यात आलीय.

नक्की वाचा >> …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेची मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आव्हाडांनी केलेल्या टीकेसंदर्भात पत्राकरांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. आव्हाड यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारण्यात आलं असता जाधव यांनी शरद पवारांचा उल्लेख केला. “मला वाटतं त्यांनी चेहऱ्यावर टीका करण्याआधी त्यांच्या नेत्याचा चेहरा पहावा आणि आम्हाला सांगावं की म्हशीच्या कुठल्या भागासारखा त्यांचा चेहरा दिसतो. पण आम्ही असं म्हणणार नाही पवारसाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. पण त्यांनी टीका करताना तारतम्य पाळावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे,” असं अविनाश जाधव म्हणाले. “फुकट तुम्ही पत्रकार परिषदेत तत्वाच्या गोष्टी करता. नंतर अचानक तुम्ही काहीही बडबडता. हे बरोबर नाहीय,” असं जाधव म्हणालेत.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांची नक्कल करत त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोले लगावले. “यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. म्हणे राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला”, अशा प्रकारे एकेरी उल्लेख करत राज ठाकरेंनी टीका केली.

नक्की वाचा >> “राज ठाकरेंचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवार…”; राज यांच्यासोबतचा पवारांचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा टोला

आव्हाडांचं प्रत्युत्तर
“त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे की माझं तोडं काहीतरी नागाच्या फण्यासारखं दिसतं. अशा वैयक्तिक कोट्या तर कोणालाही करता येतात. ते मिमिक्री आर्टिस्टचं काम आहे. पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आादर करतो जे महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे त्यांना मी अरे तुरे करत नाही. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो,” असं प्रत्युत्तर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns slams jitendra awhad for criticizing raj thackeray face scsg