महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून याबाबत मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. झोपलेल्या व्यक्तीला उठवता येते पण, झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही, असे सांगत मनसे पदाधिकाऱ्यांनी नगर अभियंता सोनाग्रा यांना कुंभकर्णची प्रतिमा भेट दिली. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गणेश विसर्जन निमित्ताने ठाणे जिल्ह्यात वाहतूक बदल

ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातील एमएमआरडीएच्या अखत्यारीत असलेल्या कोपरी पुलावर खड्डे पडले असून या ठिकाणी चार दिवसांपूर्वी खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवा आगसन रस्त्यावर दुचाकी घसरून पडली आणि त्याचवेळी टँकर खाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यामधून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> भारत पाकिस्तान सामन्यावर सट्टा ; उल्हासनगर शहरातून एकाला अटक

खड्ड्यामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून याबाबत मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. खड्ड्यामुळे कोपरी येथे झालेल्या अपघाताबाबत नगर अभियंत्यांना माहितीच नसून त्याचबरोबर शहरात कुठे खड्डे आहेत, याबाबतही त्यांना माहीत नाही, असा आरोप मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला. झोपलेल्या व्यक्तीला उठवता येते पण, झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही, असे सांगत मनसे पदाधिकाऱ्यांनी नगर अभियंता सोनाग्रा यांना कुंभकर्णची प्रतिमा भेट दिली. तसेच गणेशोत्सवाच्या काळात वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. ठाण्यातील खड्डे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कोपरी पुलाचा रस्ता एमएमआरडीएच्या अखत्यारीत असून त्यांना खड्डे बुजविण्याच्या सूचना सातत्याने देण्यात येत आहेत. त्याच इतर प्राधिकरणालाही खड्डे बुजविण्याच्या सूचना देण्यात येतात. दिवा आगमन भागात १६०० मीटर काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून जमीन वादामुळे ४०० मीटर रस्त्याचे काम रखडले आहेत. याच भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. असे अपघात होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे निरंतर सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns warns municipal engineers to plug the potholes in thane or else they will take to the streets after ganeshotsava amy