लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर येथील बोरिवडे मैदानात एका ठेकेदाराने जलवाहिन्यांची साठवणुक करण्याबरोबरच तिथे शेड उभारून हे मैदान गिंळकृत केल्याचा आरोप करत खेळाच्या मैदानातील हे साहित्य हटविण्याची मागणी मनसेने केली आहे. पालिकेने हे अतिक्रमण त्वरीत हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, खेळाच्या मैदानावर अतिक्रमण केले असेल तर ते तात्काळ हटविण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश

घोडबंदर येथील बोरिवडे भागात एक मैदान आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार ही जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. परंतु तिथे अतिक्रमण झाल्याची मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे. घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. या भागात ठाणे महापालिकेने बोरिवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही.

आणखी वाचा-डोंबिवलीत पत्नीला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केले असून, तिथे शेड उभारली आहे आणि जलवाहीन्यांची (पाईप) साठवणूक केली आहे. ठेकेदार हे पाईप त्याच्या वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे. ठाणे शहरात अनेक मैदाने आहेत. मात्र, या मैदानावर अतिक्रमण केल्यामुळे मुलांना हक्कचे खेळण्यासाठी मैदान मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पालिकेने बोरिवडे मैदानातील अतिक्रमण त्वरीत हटवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिंद्रकर यांनी दिला आहे.

घोडबंदर येथील बोरिवडे मैदानात ठेकेदाराने साहित्य ठेवून अतिक्रमण केले असेल तर ते तात्काळ काढून टाकण्यात येईल. -मीनल पालांडे, उपायुक्त, क्रीडा विभाग

Story img Loader