दररोज जे तमाशे सुरु आहेत, त्याला जनता विटली आहे. त्यामुळे आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ दूर होईल. जेव्हा कधी महापालिकांच्या निवडणुका होतील, तेव्हा आपण सत्तेमध्ये असणार म्हणजे असणारच, असे भाकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. मनसेच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यात गडकरी रंगायतन येथे राज ठाकरेंनी मनसैनिकांना संबोधित केलं. तेव्हा ते बोलत होते.

“सध्याचे राजकारण महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे असल्याचे सांगत येत्या २२ तारखेला मशीदीवरील भोंग्याचा समाचार घेणार आहे. तसेच, देशावर ६० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची काय अवस्था झाली आहे, ते बघा. त्यामुळे भरती नंतर ओहोटी आणि ओहोटी नंतर भरती या गोष्टी होत राहतात. भाजपानेही हे लक्षात ठेवावं आज भरती चालू आहे. ओहोटी येऊ शकते, कारण त्या नैसर्गिक गोष्टी आहेत. कोणी थांबवू शकत नाही,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

हेही वाचा : संदीप देशपांडेंवरील हल्ल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, इशारा देत म्हणाले, “माझ्या मुलांचं रक्त…”

“प्रत्येक राजकीय पक्षांना त्रास होतोच. भाजपा आज सत्तेवर आल्याचे दिसते. पण, त्यासाठी किती तरी जणांनी खस्ता खाल्या आहेत. १९५२ मध्ये जनसंघ स्थापन झाला. १९५२ ते २०१४ इतक्या कालावधीनंतर त्यांचे बहुमतात सरकार आलं. या प्रक्रियेतून सगळ्यांनाच जावे लावते. पण, तुम्ही त्यांच्या कालावधीचे आकडे मोजू नका, मी लवकरच आपले सरकार आणेल. आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ दूर होईल,” असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

हेही वाचा : “‘ब्लू फिल्म’ काढली असती तर बरं झालं असतं, यांनी…”, राज ठाकरेंची जोरदार टोलेबाजी

“पालिका निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र, निवडणुका कधी होतील माहित नाही. निवडणुका होत नसल्यामुळे दहावीला नापास झाल्यासारखे वाटते आहे. जेव्हा कधी पालिकांच्या निवडणुका होतील, तेव्हा आपण सत्तेत असणार म्हणजे असणारच. कारण दररोज जे तमाशे सुरु आहेत, त्याला जनता विटली आहे,” असेही राज ठाकरेंनी म्हटलं.

Story img Loader