बदलापूरः गेल्या काही वर्षात मोबाईल चोरीचा छडा लावण्यात असमर्थ ठरणाऱ्या पोलीस विभागाला केंद्र सरकारच्या नव्या यंत्रणेची मदत मिळू लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चोरीला गेलेल्या ६० मोबाईलचा शोध घेणे पोलिसांना शक्य झाले आहे. या ६० मोबाईलचे वाटप नुकतेच त्यांच्या वापरकर्त्यांना करण्यात आले.

हेही वाचा >>> ठाणे: दुकानावर मराठी पाटी नसलेल्या १५३ व्यापाऱ्यांवर कारवाई; १५ दुकान मालकांना साडेतीन लाख रुपयांचा दंड

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे

केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी केंद्रीय उपकरण ओळख रजिस्टर या अप्लीकेशनची सुरूवात केली होती. त्याच्या माध्यमातून चोरीला गेलेले, गहाळ झालेले मोबाईल शोधण्यास मदत होणार होती. त्याचा वापर करण्यास आता राज्यातील पोलिसांनी केला आहे. परिमंडळ चारमधील अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात गेल्या काही काळात मोबाईल चोऱीच्या अनेक घटना समोर आल्या. त्यासोबतच काही मोबाईल गहाळ झाल्याच्याही तक्रारी नोंद झाल्या होत्या. या तक्रारींचा तपास करत असताना बदलापूर पश्चिम पोलिसांनी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजीस्टर (CEIR) अर्थात केंद्रीय उपकरण ओळख रजीस्टर या ऍप्लिकेशनचा वापर केला. त्यात बदलापुरात गेल्या वर्षभरात २५० मोबाईल चोरीला आणि गहाळ झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल होती.

हेही वाचा >>> बेकायदा बांधकाम प्रकरण तापले; डोंबिवलीतील ४० भूमाफियांची बँक खाती गोठवली; तपास पथकाचा दणका

गुन्हे शाखेच्या स्थानिक पोलीस ठाण्यातील सायबर विभागातील कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार या विभागाचे काम सांभळणाऱ्या हनुमंत हुबे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तंत्रज्ञानाचा वापर करत गहाळ झालेल्या ६० मोबाईलचा शोघ घेतला. तपास करत असताना यातील अनेक मोबाईल परराज्यात असल्याचे दिसून आले. कर्नाटक, कलकत्ता, तामिळनाडू आणि जम्मू काश्मिर या राज्यांमध्ये हे मोबाईल होते. हे सर्व मोबाईल पुन्हा एकदा मिळवत नुकतेच बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमात वापरकर्त्यांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. याप्रसंगी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्ता गावडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> ठाणे: कशेळी ते अंजुरफाट्यापर्यंतचा प्रवास नकोसा; रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

या मोबाईलच्या शोध मोहिमेत संबंधित व्यक्तीला हे मोबाईल तुम्हाला कसे मिळाले हे विचारले असता, त्यांच्याकडून मित्र, नातेवाईक यांची नावे सांगण्यात आली. काही जणांनी तर मोबाईल रस्त्यावर मिळाल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी दम भरताच सर्वांनी हे मोबाईल पोस्टाने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात पाठवले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्ष दत्ता गावडे यांनी दिली आहे. तसेच असे तंत्रज्ञान विकसीत होत असल्याने मोबाईल विकत घेताना ते अधिकृत विक्रेत्याकडूनच विकत घ्यावे असेही आवाहन यावेळी पोलीसांनी उपस्थितांना केले.