कल्याण मधील बिर्ला महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल भुरट्या चोराने चोरून नेले आहेत. एका विद्यार्थ्याच्या तक्रारी वरुन पोलिसांनी मोबाईल चोरांचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा- डोंबिवली : बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टेट बँकेतून कर्ज घेण्याचा भूमाफियांचा प्रयत्न

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

अभिषेक परब असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मिलिंदनगर गौरीपाडा भागात राहतो. शुक्रवारी सकाळी अभिषेक आणि त्याचा एक मित्र बिर्ला महाविद्यालयाच्या मागील प्रवेशव्दारातून येत होते. यावेळी भुरट्या चोराने अभिषेक आणि त्याच्या मित्राचा मोबाईल फोन चोरला. सोळा हजार रुपये किमतीचे मोबाईल आहेत. मोबाईल मध्ये अभ्यासक्रमाची टिपणे, सादरीकरणाचे प्रकल्प होते. ते चोरीला गेल्याने विद्यार्थी अस्वस्थ आहेत.

हेही वाचा- “…म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात”, राज ठाकरेंनी केली प्रतिक्रिया व्यक्त

अभिषेकने याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महाविद्यालय परिसरात सकाळ, दुपारच्या वेळेत विद्यार्थी ये-जा करतात. या संधीचा गैरफायदा घेत दुचाकीवरुन काही भुरटे चोर येऊन ते विद्यार्थ्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून घेऊन जात आहेत. महाविद्यालय परिसरात सकाळ, दुपारच्या वेळेत पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.