कल्याण येथील पश्चिमेतील वर्दळीच्या अहिल्याबाई चौकातील एक मोबाईलचे दुकान रात्रीच्या वेळेत फोडून चोरट्यांनी तीन मिनिटाच्या कालावधीत दुकानातील ३० लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरुन नेले. असाच प्रकार गेल्या आठवड्यात कल्याण पूर्व भागात घडला होता. घरफोड्या, दुकानांमधील चोऱ्यांमुळे रहिवासी, व्यापारी हैराण आहेत.
हेही वाचा >>>बेशिस्त रिक्षाचालकांमुळेच कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी, नागरिकांचा आरोप; RTO दुर्लक्ष करत असल्याचीही तक्रार
पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे ऐवज दिवसाढवळ्या हिसकावून पळून जाणे, बंद घरावर पाळत ठेऊन त्या घरात दिवसा, रात्री चोरी करणे या प्रकाराने घराबाहेर जायचे की नाही, असे प्रश्न रहिवासी करू लागले आहेत.अहिल्याबाई चौकात भिवंडी जवळील कोन गावातील रहिवासी पवनकुमार झा याचे मोबीवर्ल्ड नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. चैत्र पाडव्यानिमित्त ग्राहकांची मोबाईल खरेदीसाठी गर्दी असते म्हणून त्यांनी अधिकचे मोबाईल दुकानात आणून ठेवले होते.
हेही वाचा >>>दस्त नोंदणीतून ठाणे जिल्ह्याची विक्रमी वसुली; ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वाधिक दस्त नोंदणी
रविवारी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करुन ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी दुकानात आले, तेव्हा त्यांना दुकानाचे लोखंडी प्रवेशव्दार उघडे दिसले. त्यांनी दुकानात पाहिले तर दुकानातील मोबाईल चोऱट्याने चोरुन नेले होते. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली आहे. तीन मिनिटाच्या कालावधीत चोरट्याने दुकानातील ३० लाखाचे मोबाईल गोणीत भरुन पळून गेला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात पवनकुमार यांनी तक्रार केली आहे.