कल्याण- कल्याण, डोंबिवलीत मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याने पायी चाललेल्या पादचाऱ्यांच्या हातामधील मोबाईल दुचाकीवरुन येणारे दोन भुरटे चोर हिसकावून पळून जात आहेत. सोमवारी दिवसभरात शहराच्या विविध भागात अशाप्रकारच्या तीन घटना घडल्या. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेले.

डोंबिवलीतील कचोरे पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन घरांमध्ये राहत असलेली जोहरा हैदर शेख (१६) ही विद्यार्थीनी सोमवारी सकाळी खासगी शिकवणीसाठी पायी गोविंदवाडी कचोरे भागातून जात होती. यावेळी तिच्या पाठीमागून दोन जण दुचाकीवरुन आले. त्यांनी अचानक दुचाकी जोहराच्या अंगावर आणली. ती भीतीने बाजुला होताच, बेसावध असलेल्या जोहराच्या हातामधील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकवून तिला धक्का देऊन दुचाकीवरील दोन जण वेगाने पळून गेले. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Senior citizens mobile phone stolen in front of Narayan Peth police post
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे

हेही वाचा >>> ठाणे: घोडबंदर भागात रिक्षा उलटून लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

कल्याण पश्चिमेतील भोईरवाडीतील सेंट्रल एक्साईज सोसायटीमध्ये राहणारा अभिषेक शाम ठाकूर (१७) हा इयत्ता बारावीत शिकत आहे. सोमवारी सकाळी तो खासगी शिकवणीसाठी संतोषी माता रस्त्यावर पायी चालला होता. यावेळी त्याच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी अभिषेकच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळ काढला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्याने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>Video : उल्हासनगरचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय अंधारात; आठ तासानंतर वीज पुरवठा सुरू, तांत्रिक गोंधळात रुग्णांचे हाल

तिसऱ्या घटनेत, डोंबिवलीतील गोग्रासवाडी अंबिकानगर भागात राहत असलेले चंद्रशेखर कटारे (४८) यांच्या माऊली सोसायटीतील घरात उघड्या दरवाजावाटे येऊन चोरट्याने काल सकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांचा आणि पत्नीचा मोबाईल चोरुन नेला. बारा हजार रुपये किमतीचे हे मोबाईल आहेत.टिळकनगर पोलीस ठाण्यात चंद्रशेखर यांनी तक्रार केली आहे.

Story img Loader