कल्याण- येथील संतोषी माता रस्त्यावरील श्री सद्गुरू मोबाईल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी गुरुवारी रात्री दुकानातील आठ लाख रुपये किमतीचे महागडे सत्तर मोबाईल चोरून नेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुकानाचे मालक नीलेश जगताप यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपींचा शोध सुरू केला आहे. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता नीलेश दुकान बंद करुन घरी गेले. रात्रीच्या वेळेत चोरट्यांनी दुकानाचे मुख्य लोखंडी दार उघडून दुकानातील ७० महागडे मोबाईल गुंडाळून पळून गेले.

हेही वाचा >>> कचऱ्यातील टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर करण्यासाठी कडोंमपात १० संकलन केंद्रे

शुक्रवारी सकाळी दुकान मालक नीलेश यांना त्यांचा एक मित्र रमेश गौड यांनी दुकानाचे लोखंडी दार तोडले असून दुकानात चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला. नीलेश यांनी तात्काळ पोलिसांना ही माहिती देऊन ते दुकानात आले. चोरट्यांनी दुकानातील आठ लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले. वर्दळीच्या संतोषी माता रस्त्यावर चोरी झाल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile worth rs eight lakh stolen in kalyan zws