कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाचे मान्सूनपूर्व सराव शिबीर नुकतेच पार पडले. पावसाळ्यातील संभाव्य धोक्यांशी सामना करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाल्याचा दावा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे. 

– कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वतीने बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज धरणात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाचे मान्सूनपूर्व सराव शिबीर झाले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता पी. डी. कानडे हे या वेळी उपस्थित होते. या शिबिरात पूर परिस्थितीत नागरिकांना पाण्याबाहेर कसे काढावे, सुरक्षित स्थळी कसे हलवावे तसेच अन्य कशा प्रकारे मदत करता येते याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने प्रात्यक्षिकासह माहिती दिली. नगर परिषदेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन विभाग कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन सराव केला.
– दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या आदेशानुसार नगर परिषद कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ नियंत्रण कक्षाच्या २६९०२७१ आणि २६९०८९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
– कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आपत्ती निवारण विभागाकडे दोन इंजिनच्या बोटी, १ रबर बोट त्याशिवाय ३५ लाइफ जॅकेट, २० एअर टय़ूब, १५ लाइफ रिंग, झाडे कापण्याची दोन यंत्रे, तसेच दोरखंड व बचावासाठी लागणारे इतर साहित्य उपलब्ध आहे.

– पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींशी सामना करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून, सर्व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांसाठी संक्रमण शिबिरेदेखील तयार करण्यात येणार आहेत.
– -भागवत सोनोने, अग्निशमन अधिकारी, बदलापूर नगरपालिका

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
Story img Loader