ठाणे : तुलसी या एक्स्प्रेसगाडीमध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन काही जणांनी एका माॅडेलवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने ३९ दिवसानंतर याप्रकरणी ग्वाल्हेर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेथून २१ दिवसांनी हे प्रकरण ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. ठाणे लोहमार्ग पोलिसांची विविध पथके याप्रकरणाचा तपास करीत असले तरी या घटनेसंबंधीचे ठोस पुरावे पोलिसांना अद्याप मिळू शकलेले नाहीत. यामुळे पोलिसांनी आता विविध दिशेने तपासाची चक्रे वळविली आहेत.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती ग्वाल्हेरमध्ये राहते. ती माॅडेलिंग करण्यासाठी मुंबईत येत असते. १० मार्चला ती तुलसी एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने प्रवास करत होती. रेल्वेगाडी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असता, काही जणांनी तिला गुंगीकारक औषध दिले. त्यानंतर तिच्यावर काहीजणांनी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार झाल्यानंतर पीडित तरुणीने ३९ दिवसांनी ग्वाल्हेर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेथून हे प्रकरण २१ दिवसांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तपासासाठी आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी विविध पथके तयार केली. ज्या दिवशी तरुणीने प्रवास केला. त्यादिवशीच्या तिकीटांचा तपशील पोलिसांनी प्राप्त केला. पंरतु पीडीत महिलेच्या नावाचे कोणतेही तपशील पोलिसांना आढळलेला नाही.

Kuldeep Sengar Bail
Kuldeep Sengar Bail : उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगरला अंतरिम जामीन, AIIMS मध्ये होणार शस्त्रक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
Teacher gets 5 years in jail for molesting girls
अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला सक्तमजुरी
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Auto rickshaw driver arrested for raping young woman
मुंबई : तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक

हेही वाचा – कल्याणमधील गोविंद करसन चौकातील बस थांब्यामुळे वाहन कोंडी

हेही वाचा – पोलीस निवडणूक बंदोबस्तावर असल्याने कल्याण, डोंबिवलीत घरफोड्या वाढल्या

तुलसी एक्स्प्रेससह गोरखपूर, कुशीनगर या रेल्वेगाड्यांच्या तिकीटांचा देखील तपशील काढला. त्यामध्येही पीडीत महिलेचे नाव नव्हते. पोलिसांनी एलटीटी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेला दोन महिन्यांहून अधिकचा कालावधी झाल्याने सीसीटीव्ही चित्रीकरण मिळू शकलेले नाही. पोलिसांच्या पथकाने तिकीट तपासणीसांना याबाबत विचारले. परंतु त्यांनीही लैंगिक अत्याचाराबाबत कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. ठाणे लोहमार्ग पोलीस पीडित महिलेसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. घटना गंभीर असल्याने पोलिसांकडून याप्रकरणाची पडताळणी केली जात आहे.

Story img Loader