‘रोटीमेकर’द्वारे रुग्णांना गरम चपात्यांचा पुरवठा; यंत्र वापरणारे पहिले रुग्णालय

Diwali diya jugaad diya in cooker video
Kitchen Jugaad Video: महिलांनो दिवाळीत फक्त एकदा कुकरमध्ये पणत्या ठेवा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
1932 citizens registrations for affordable housing under pmrda scheme
पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; सदनिकेसाठी १ हजार ९३२ नागरिकांची नोंदणी
Eggs and height: We find out if there is any link what do you do for increasing height
आहारात नियमित अंडी खाल्ल्याने उंची वाढते का? डॉक्टरांनी दिलेली माहिती एकदा वाचा
Success Story of Dr. Prathap C. Reddy who goes to the office daily at 91 founder of Apollo Hospitals know his Net Worth
वयाच्या ९१व्या वर्षीही रोज जातात ऑफिसला, वाचा ७१ रुग्णालये आणि कोटींची संपत्ती असलेल्या डॉ. प्रताप रेड्डी यांचा प्रेरणादायी प्रवास
Around 1230 contract posts in Mumbai hospitals were canceled for election work assignments
महानगरपालिका रुग्णालयातील आरोग्य सेवेचा खेळखंडोबा, कंत्राटी पदे रद्द केल्यानंतर आता कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी रवाना
Sassoon hospital
बालकांच्या आनुवंशिक आजारांचे आता वेळीच निदान! ससूनमध्ये गरीब रुग्णांसाठी स्वस्तात सुविधा सुरू
Beds in intensive care unit will be available for emergency patients in GT Hospital Mumbai print news
अत्यवस्थ रुग्णांना जी.टी. रुग्णालयाचा लवकरच दिलासा; कसा ते वाचा…

येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्वयंपाकघराच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रुग्णांना गरमागरम रुचकर स्वयंपाक मिळावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीने नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत त्यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात अत्याधुनिक साधने कार्यान्वित केली जात असून त्यात रोटीमेकरचाही समावेश आहे. त्यामुळे मनोरुग्णांना यंत्राद्वारे केल्या जाणाऱ्या गरमागरम चपात्या मिळणार आहेत. अशा प्रकारचे रोटीमेकर वापरणारे हे राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार आहे.

येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दरदिवशी साधारण १५५० रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. या सर्व रुग्णांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय येथे केली जाते. रुग्णालयातील स्वयंपाकघरात ३६ आचारी कार्यरत आहेत. सकाळ-संध्याकाळच्या मिळून येथे सहा हजार चपात्या लागतात. त्यामुळे आचाऱ्यांना बराच खटाटोप करावा लागतो. भल्या पहाटे त्यासाठी तयारी करावी लागते. त्यामुळे रुग्णांना गरमागरम पोळी मिळत नाही. मनोरुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र शिरसाठ यांनी ही खंत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी त्वरित पावले उचलून येथील स्वयंपाकगृह सुधारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून ३५ लाख रुपये मंजूर केले. त्यातून रुग्णालयात अर्धस्वयंचलित पद्धतीची रोटीमेकर यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्याद्वारे एका तासात एक हजार पोळ्या तयार केल्या जाऊ शकतात. याशिवाय स्वयंपाकघर दुरुस्तीची कामेही या निधीतून केली जाणार आहेत, अशी माहिती शाखा अभियंता महेश लाड यांनी दिली.