ठाणे – ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील पडवळनगर परिसरात नाल्यात मंगळवारी दुपारी घोरपड आढळून आली. आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांनी या घोरपडीची सुरक्षित सुटका केली. सुटका केलेल्या घोरपडीस वनविभाग कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. वागळे इस्टेट भागातील पडवळनगर परिसरात नाल्यात घोरपड आढळून आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवलीत रिजेन्सी इस्टेटमधील विकासकाच्या घरात चोरी

आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन या घोरपडीची सुरक्षितरित्या सुटका केली. या घोरपडीस वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. ही घोरपड मादी असून ४ ते ५ महिन्यांची असल्याची माहिती वनविभागाने दिली.