ठाणे, कल्याण, बदलापूर : ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर कायम होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेताच सखल भागात साचलेले पाणी ओसरले. तसेच पाणी ओसरल्याने उल्हास नदी इशारा पातळीच्या खाली आली. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. बुधवारच्या तुलनेत मात्र गुरुवारी परिस्थिती आटोक्यात होती. गेल्या चोवीस तासांत ठाणे, बदलापूर, कल्याण आणि भिवंडी शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली.

गेल्या चोवीस तासांत ठाणे शहरात २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी म्हणजेच ४ जुलै २०२२ रोजी शहरात १४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षी हा सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. मोठय़ा प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरातील वंदना सिनेमागृह, वृंदावन तसेच इतर अशा ८ सखल भागांमध्ये पाणी साचले होते. दुपारी पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरले. शहरातील उपवन तलाव ओसंडून वाहू लागला आहे. पहाटेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे ३० ठिकाणी झाडे उन्मळून पडले तर ३ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या भिवंडी येथील कशेळी तसेच  परिसराचा वीजपुरवठा १३ ते १४ तास खंडित होता. गेल्या २४ तासांत बदलापूर शहरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल उल्हासनगर शहरात ३१३ मिलिमीटर आणि अंबरनाथ शहरात २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला

उल्हासनगर: उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात राधाबाई चौक येथील रामायणनगर परिसरात असलेल्या चार मजली द्वारका धाम या इमारतीचा सज्जा गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. उल्हासनगर महानगरपालिकेने वेळोवेळी नोटिसा देऊन ही इमारत रिकामी केली होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीच्या ए आणि बी विंग असून त्यात एकूण ६६ सदनिका आणि एक दुकान होते. महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केलेली होती.

दिवसभरात राज्यात १३ जण दगावले मुंबई : गेल्या २४ तासात अतिवृष्टी, पूर व नैसर्गिक आपत्तीमुळे १३ जण दगावले आहेत. तसेच कोकण आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे विविध नद्यांना पूर आले आहेत.  रायगड जिल्ह्यातील इरशाळ येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जण मरण पावल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली. याशिवाय मुंबई शहर, बुलढाणा आणि वाशिममध्ये प्रत्येकी एक जण मरण पावले आहेत. उर्वरित तिघेही घर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील आहेत.

Story img Loader