ठाणे: कल्याणमध्ये आयोजित अखंड वाचन यज्ञाला वाचकांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दर्शवला. अभिवाचन सत्र, कथा वाचन, ललित वाचन ,काव्य संमेलन, बालसाहित्य वाचन, महिलांचे काव्यसंमेलन, पत्रकारांचे अभिवाचन, भयकथा आणि आध्यात्मिक साहित्य वाचन अशा विविध सत्रात हे वाचन यज्ञ पार पडले. यामध्ये १२०० हून अधिक वाचक सहभागी झाले हाते. तसेच जिल्हा परिषद शाळांचा देखील सहभाग होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, बालक मंदिर संस्था आणि कल्याण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सलग ३६ तास अखंड वाचन करण्यात आले. विविध ठिकाणी एकाचवेळी हे वाचन यज्ञ सुरु होते. नाशिक मधील दहा शाळांनी देखील या वाचन यज्ञात सहभाग नोंदवला. शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील ४० शिक्षकांनी पाऊलखुणा याचे वाचन करण्यासाठी महिनाभर आधीपासून तयारी केली होती. या वाचन यज्ञातील भयकथा हे सत्र रात्री ११ नंतर सुरु करण्यात आले. भयकथांचा प्रभाव सत्र संपल्यानंतरही वाचकांवर झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा… डोंबिवलीत मोठागावमध्ये निसर्ग उद्यानासाठी हरितपट्ट्यावर मातीचा भराव; महसूल विभागाकडून गंभीर दखल

या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन सत्र , वि. आ. बुवा वाचनसत्र , बाबासाहेब पुरंदरे वाचन सत्र, मंगला नारळीकर वाचन सत्र , शांताबाई शेळके वाचनसत्र , कवी केशवसुत वाचनसत्र, नारायण धारप वाचनसत्र, वामनदादा कर्डक वाचनसत्र, अण्णाभाऊ साठे वाचनसत्र डॉ.ए पी वाचन सत्र, जी . ए.कुलकर्णी वाचनसत्र, गंगाधर गाडगीळ वाचन सत्र , सुधाताई करमरकर वाचनसत्र, ना. धो. महानोर वाचनसत्र , नलेश पाटील सत्र अशा विविध सत्रांमध्ये कथा, कविता , ललित , नाट्य, एकांकिका, लेख इत्यादी विविध साहित्य प्रकार सादर करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 1200 readers and zilla parishad schools participated in akhand vachan yagya organized in kalyan dvr