महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त १६ व्या राज्यस्तरीय अॅरोबिक्स-जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन मुलुंड येथे करण्यात आले होते. ६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत डोंबिवलीच्या अॅरोबिका द स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेच्या सहा खेळाडूंनी बारा पदकांची कमाई करून घवघवीत यश संपादन केले आहे. यात आकाश शेंडकर यास दोन सुवर्ण, स्वराली रावले हिस एक सुवर्ण व एक रौप्य, सार्थक रावले यास दोन रौप्य व एक कांस्य, अनिकेत बोराडे यास दोन रौप्य, जाई मानकामे हिस एक रौप्य व एक कांस्य, आदित्य पवार यास एक रौप्य पदक मिळाले आहे. या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक म्हणून संगीता रावले व अशोक शेंडकर यांनी काम पाहिले आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव मानकामे यांनी दिली.
अॅरोबिक्स-जिम्नॅस्टिकमध्ये पदकांची लयलूट
१६ व्या राज्यस्तरीय अॅरोबिक्स-जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन मुलुंड येथे करण्यात आले होते.
Written by मंदार गुरव
First published on: 10-12-2015 at 04:26 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than six player get medals in aerobic gymnastics state level competition